पूर्णिया, 16 ऑगस्ट : भाऊ-बहीण वर्षभर दोन सणांची आतुरतेने वाट पाहतात. ते म्हणजे रक्षाबंधन आणि भाऊबीज. त्यापैकी रक्षाबंधन सण आता काहीच दिवसांवर आहे. अगदी पुढच्याच आठवड्यात बहीण भावाच्या मनगटावर राखी बांधून त्याला आपलं संरक्षण करायला सांगेल. या पवित्र नात्यातला गोडवा आणखी वाढवा, म्हणून हे सण साजरे केले जातात. मात्र तुम्हाला माहितीये का, बहिणीने भावाला राखी कधीही शुभ मुहूर्तावरच बांधावी. परंतु यंदा नेमकी कधी राखी बांधावी याबाबत जवळपास सर्वांच्याच मनात संभ्रम आहे. त्यामुळे आता आपण हा सण साजरा करण्याचा शुभ मुहूर्त जाणून घेऊया.
advertisement
रक्षाबंधन सणाची परंपरा अत्यंत प्राचीन काळापासून चालत आली आहे. कॅलेंडरमध्ये यंदा 30 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, हा सण नेहमी श्रावण पौर्णिमेला साजरा केला जातो, तर भद्रकाळात राखी बांधली जात नाही. यंदा श्रावण पौर्णिमा 30 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजून 58 मिनिटांनी सुरू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच 31 ऑगस्ट रोजी सकाळी 07 वाजून 05 मिनिटांनी संपेल. याच काळात 30 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजून 58 मिनिटांपासून रात्री 09 वाजून 01 मिनिटापर्यंत भद्रकाळ असणार आहे.
रोज हनुमान चालीसा पठण करण्याचे काय आहेत फायदे?
अर्थातच रक्षाबंधन साजरा करण्यासाठी 30 ऑगस्ट रोजी सकाळी शुभ मुहूर्त नाही. मात्र या दिवशी रात्री 09 वाजून 01 मिनिटानंतर आपण हा सण साजरा करू शकता. तसंच 31 ऑगस्टच्या सकाळी 07 वाजून 05 मिनिटांपर्यंत श्रावण पौर्णिमा असल्याने आपण याआधीदेखील राखी बांधू शकता. याचाच अर्थ रक्षाबंधन हा सण यंदा 2 दिवस साजरा करता येणार आहे.
बहीण-भावाचं नातं हे अतिशय खोडकर असलं, त्यात लहान-मोठं भांडण, भयंकर खोड्या असल्या तरीही ते अत्यंत पवित्र नातं असतं. या नात्यातील प्रेम जपण्यासाठी, त्याची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जगभरात रक्षाबंधन सण साजरा केला जातो. यानिमित्ताने बहीण भावाच्या मनगटावर राखी बांधून तिच्याकडून रक्षणाचं वचन घेते. राखीचाच अर्थ रक्षण कर असा होतो.
यंदा राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त :
30 ऑगस्ट : रात्री 09 वाजून 01 मिनिटानंतर.
31 ऑगस्ट : सकाळी 07 वाजून 05 मिनिटांपर्यंत.