सोबत येऊन सुख-दु:ख वाटतात हे वृद्ध नागरिक, रोज सकाळी येऊन योगाही करतात, तरुणांसाठी बनताय प्रेरणादायी उदाहरण!

Last Updated:

एक असा वृद्धांचा ग्रुप आहे, ज्यामध्ये सर्व ज्येष्ठ नागरिक आहेत आणि सर्वजण इतके तंदुरुस्त, तसेच जवान दिसतात की, ते ज्येष्ठ नागरिक आहेत, असे त्यांना पाहिल्यावर कुणीही म्हणणार नाही.

ज्येष्ठ नागरिकांचा ग्रुप
ज्येष्ठ नागरिकांचा ग्रुप
अंजलि सिंह राजपूत, प्रतिनिधी
लखनऊ, 15 ऑगस्ट : सेवानिवृत्तीनंतर किंवा ज्येष्ठ नागरिक झाल्यानंतर, बहुतेक वडीलधारी किंवा वृद्ध व्यक्ती हे आपल्या घरातच राहतात, बाहेर कुठे जात नाही. एकीकडे वय झालेले असते, तर दुसरीकडे विविध आजारांनीही काही लोक ग्रस्त असल्याचे पाहायला मिळते. मात्र, एकीकडे हे सर्व दिसत असताना दुसरीकडे एक अनोखा प्रकार पाहायला मिळत आहे.
काही वृद्धांनी वृद्धत्वाची व्याख्याच बदलली आहे. एक असा वृद्धांचा ग्रुप आहे, ज्यामध्ये सर्व ज्येष्ठ नागरिक आहेत आणि सर्वजण इतके तंदुरुस्त, तसेच जवान दिसतात की, ते ज्येष्ठ नागरिक आहेत, असे त्यांना पाहिल्यावर कुणीही म्हणणार नाही.
advertisement
लखनऊ शहरातील ज्येष्ठ नागरिकांच्या या संपूर्ण ग्रुपचे नाव आहे 'जीवन ज्योती हस्य योग संस्थान' आहे. याची सुरुवात 17 ऑक्टोबर 2017 रोजी सुरू झाले. या ग्रुपचे सरचिटणीस रामस्वरूप शर्मा आणि अध्यक्ष कमलेश यादव आहेत. त्यांनी सांगितले की, ज्येष्ठ नागरिक किंवा कोणत्याही वयोगटातील व्यक्तीने रोज या उद्यानात यावे, योगासने करावीत, एकमेकांचे सुख-दु:ख वाटून घ्यावे, तसेच थोड्या वेळासाठी मोबाईल घरीच सोडून द्यावे आणि इथे येऊन हसून, धावून आणि मज्जा करून आनंदी राहावे, असा हा ग्रुप सुरू करण्यामागचा उद्देश होता. हा ग्रुप सुरू झाला तेव्हा यामध्ये फक्त 10 लोक होते. मात्र, तुम्हाला विश्वास बसणार नाही पण आज ग्रुपमध्ये 250 लोक आहेत. विशेष म्हणजे, या 250 लोकांमध्ये सर्व वयोगटातील लोक आहेत पण ज्येष्ठ नागरिक जास्त आहेत.
advertisement
सर्वजण एकत्र येऊन साजरा करतात सण -
या ग्रुपच्या सदस्या समीक्षा भदौरिया, सविता सिंह, वंदना आणि संतोष कुमारी यांनी सांगितले की, या ग्रुपमध्ये सर्व वयोगटातील लोक आहेत. तसेच यामद्ये जे ज्येष्ठ नागरिक आहेत, ते येथे येऊन स्वतःला अजिबात ज्येष्ठ नागरिक मानत नाहीत. तसेच येथे आल्यावर सगळे हसतात आणि एकमेकांशी विनोद करतात. विशेष म्हणजे, सर्व धर्म आणि जातीचे लोक एकत्र येऊन सण साजरा करतात.
advertisement
सोशल मीडियावर या ग्रुपला खूप दिवसांपासून खूप पसंती मिळत आहे. सेक्टर 25 इंदिरा नगरच्या स्वर्ण जयंती विहार पार्कमध्ये हा ग्रुपचे सदस्य दररोज सकाळी 6 ते 7 या वेळेत येतात. हा संपूर्ण ग्रुप हिवाळ्यात साडेसहा ते साडेसात या वेळेत उद्यानात एकत्र वेळ घालवतो. या ग्रुपच्या सदस्यांना पाहून आजच्या तरुण पिढीला प्रोत्साहन मिळते.
मराठी बातम्या/देश/
सोबत येऊन सुख-दु:ख वाटतात हे वृद्ध नागरिक, रोज सकाळी येऊन योगाही करतात, तरुणांसाठी बनताय प्रेरणादायी उदाहरण!
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement