भारतीय लष्कराच्या सामर्थ्यात मोठी भर
भारतीय लष्कर आणि हवाई दलाची ताकद वाढवण्यासाठी हा सौदा ‘आत्मनिर्भर भारत’ मोहिमेचा एक मोठा टप्पा मानला जात आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज ‘प्रचंड’ लढाऊ हेलिकॉप्टर (Light Combat Helicopter - LCH) हे जगातील एकमेव हेलिकॉप्टर आहे. जे तब्बल 16,400 फूट (5000 मीटर) उंचीवर सहजतेने ऑपरेट करू शकते.
advertisement
भारताच्या स्वप्नपूर्तीचा क्षण: अमेरिका, फ्रान्सला धक्का; Air Force मिळणार 'MK1A'
‘प्रचंड’ हेलिकॉप्टरची वैशिष्ट्ये आणि सामर्थ्य:
उंच ठिकाणी ऑपरेशनसाठी योग्य: हे हेलिकॉप्टर सियाचिन, लडाख आणि अरुणाचल प्रदेश यांसारख्या दुर्गम आणि उंच भागात सहज कार्यक्षम राहू शकते.
विविध प्रकारच्या क्षेपणास्त्रांसह सुसज्ज: ‘प्रचंड’ एअर-टू-ग्राउंड आणि एअर-टू-एअर क्षेपणास्त्र डागण्यास सक्षम असून, शत्रूच्या हवाई संरक्षण व्यवस्थेला उद्ध्वस्त करू शकते.
बख्तरबंद तुकडींना सपोर्ट: हे हेलिकॉप्टर टँक, तळ आणि लष्करी वाहनांवर हल्ला करण्यासाठी उपयुक्त आहे.
‘मेक इन इंडिया’ अंतर्गत निर्मिती: हे संपूर्ण भारतीय तंत्रज्ञानावर आधारित हेलिकॉप्टर आहे आणि आत्मनिर्भर भारत मोहिमेस चालना देणारे आहे.
भारतीय लष्कराची ताकद वाढणार: या हेलिकॉप्टरच्या समावेशामुळे भारतीय वायुदलाच्या आक्रमक हेलिकॉप्टर ताफ्यात विविधता येणार आहे आणि लष्कराला अधिक बळ मिळणार आहे.
भारताच्या संरक्षण क्षेत्रात मोठी गुंतवणूक
सरकारने ‘मेक इन इंडिया’ मोहिमेअंतर्गत आत्मनिर्भरतेला प्रोत्साहन देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर संरक्षण क्षेत्रात गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे.
-83 लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्ट (LCA) ची मागणी आधीच पूर्ण झाली असून, 97 नवी विमाने खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
-307 ATAGS हॉवित्झर तोफा खरेदीसही अलीकडेच मंजुरी मिळाली आहे.
भारतीय संरक्षण क्षेत्रासाठी नवीन पर्व
‘प्रचंड’ हेलिकॉप्टरच्या समावेशामुळे भारतीय लष्कराच्या आक्रमक क्षमतेत मोठी वाढ होईल. HAL च्या या प्रकल्पामुळे देशांतर्गत संरक्षण उत्पादनाला चालना मिळेल आणि भारताला संरक्षण क्षेत्रात अधिक स्वावलंबी बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल.