TRENDING:

कितीही प्रयत्न करा, ओळखणे कठीण; बिहारच्या मतदार यादीतील आश्चर्यचकित करणारा फॅक्टर, स्वत: आयोगाने सांगितले पण कोणाला कळाले नाही

Last Updated:

Bihar Assembly Elections: बिहार विधानसभा निवडणुकीत मतदारांची संख्या 7.43 कोटी इतकी झाली आहे. यामध्ये 100 वर्षांवरील 14 हजार शतायू मतदारही आहेत, जे शतक पूर्ण करूनही मतदानाच्या प्रक्रियेत सक्रिय आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
News18
News18
advertisement

नवी दिल्ली/पाटणा: निवडणूक आयोगाने बिहार विधानसभा निवडणुकीसाठीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. राज्यात 2 टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान ६ तर दुसऱ्या टप्प्यातील मतदान 11 नोव्हेंबर रोजी होईल. निवडणुकीचा निकाल 14 तारखेला जाहीर होणार आहे. आयोगाने राज्यातील निवडणुकीचा कार्यक्रम सविस्तर जाहीर केला. यातील असा एक मुद्दा ज्याकडे कोणाचे लक्ष गेले नाही.

advertisement

निवडणूक आयोगाने (Election Commission of India) जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, बिहारमध्ये मतदारांची एकूण संख्या 7.43 कोटी इतकी विक्रमी झाली आहे. ही आकडेवारी 30 सप्टेंबर 2025 पर्यंतची आहे. या विशाल मतदार यादीत एक खास आणि प्रेरणादायी गट समाविष्ट आहे, तो म्हणजे 100 वर्षे किंवा त्याहून अधिक वय असलेल्या 'शतायु' मतदारांचा होय.

advertisement

100 वर्षांवरील 14 हजार मतदार

बिहारच्या मतदार यादीतील एक अत्यंत महत्त्वाचा आणि लक्षवेधक आकडा म्हणजे 14 हजार नागरिक हे 100 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे आहेत आणि ते मतदानाच्या पवित्र हक्कासाठी पात्र ठरले आहेत. त्यांचे हे शतक पूर्ण करूनही लोकशाही प्रक्रियेत सक्रिय राहण्याचे समर्पण इतरांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे.

advertisement

मतदारांची सविस्तर आकडेवारी

एकूण मतदार: 7.43 कोटी

पुरुष मतदार: सुमारे 3.92 कोटी

महिला मतदार: सुमारे 3.50 कोटी

ट्रान्सजेंडर मतदार: 1,725

दिव्यांग मतदार: 7.2 लाख

advertisement

85 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक (Senior Citizens): 4.04 लाख

100 वर्षांवरील 'शतायु' मतदार: 14 हजार

सर्व्हिस व्होटर्स (Service Voters): 1.63 लाख

बिहारच्या मतदार यादीत तरुणाईचा सहभाग मोठ्या प्रमाणात दिसून येतो. 20 ते 29 वयोगटातील युवा मतदारांची संख्या सुमारे 1.63 कोटी इतकी प्रचंड आहे. त्याचबरोबर 18 ते 19 वयोगटातील प्रथमच मतदान करणारे (First-Time Voters) नागरिकही सुमारे 14.01 लाख इतके आहेत. युवा शक्तीचा हा उत्साह बिहारच्या निवडणुकीत महत्त्वाचा ठरणार आहे.

एकूणच 100 वर्षे पूर्ण केलेल्या 14 हजार नागरिकांचा सहभाग हा केवळ एक आकडा नसून, तो लोकशाही मूल्यांवरचा विश्वास आणि मतदानाचे महत्त्व अधोरेखित करणारा एक मोठा संदेश आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
महिलांनो व्यवसाय सुरू करायचाय? पुण्यात इथं मिळतंय मोफत मार्गदर्शन, Video
सर्व पहा

मराठी बातम्या/देश/
कितीही प्रयत्न करा, ओळखणे कठीण; बिहारच्या मतदार यादीतील आश्चर्यचकित करणारा फॅक्टर, स्वत: आयोगाने सांगितले पण कोणाला कळाले नाही
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल