बिहारच्या निकालात महाराष्ट्र पॅटर्न (Maharashtra Pattern) दिसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेष म्हणजे बिहारच्या राजकारणात सर्वाधिक चर्चा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची होती. याचे कारण महाराष्ट्राने महायुतीने गेली विधानसभा निवडणूक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वात लढतोय. मुख्यमंत्रिपदाचा निर्णय निवडणूक निकालानंतर घेऊ, अशी भूमिका महाराष्ट्रात भाजपनं गेल्या वर्षी घेतली होती. आता तशीच भूमिका भाजपनं बिहारमध्ये घेतली होती. विधानसभा निवडणूक मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्त्वात लढतोय. मुख्यमंत्रिपदाचा निर्णय विधानसभा निवडणूक निकालानंतर असा पवित्रा भाजपनं बिहारमध्ये घेतला होता. मात्र सुरुवातीच्या कलात सत्ताधारी एनडीए बहुमताजवळ पोहचले असून विजय जवळपास निश्चित मानला जात आहे.
advertisement
नेमकं काय गिरीराज सिंह म्हणाले?
नितीश कुमारचं बिहारचे मुख्यमंत्री होणार आहे. बिहारच्या जनतेला शांती हवी असून त्यांनी एनडीए भरभरून प्रेम दिले आहे, असे गिरीराज सिंह म्हणाले. बिहार विधानसभा निवडणुकीसाठी एनडीएने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रिपदाचे उमेदवार जाहीर केलेले आहेत. मात्र सुरुवातीच्या कलामंध्ये नितीश कुमारांचा पक्ष जनता दल (जेडीयू ) सध्या एनडीएमध्ये आघाडीचा पक्ष ठरला आहे. सकाळी १० वाजता हाती आलेल्या आकडेवारीनुसार जेडीयू 76 जागावर तर भाजप 69 जागांवर आहे.
नितीश कुमार आपली सत्ता कायम राखणार
बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार आपली सत्ता कायम राखणार की तेजस्वी यादव सत्तांतर घडवणार याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या होत्या. या निवडणुकीत सत्ताधारी एनडीए आणि महागठबंधन यांच्यात महत्त्वाची लढत आहे. तिसरा पक्ष जनसुराज देखील पहिल्यांदाच निवडणूक रिंगणात उतरलाय. बिहार विधानसभेत एकूण 243 जागा आहेत. मात्र, सुरुवातीच्या दीड तासांच्या कलांमध्ये जेडीयू आणि भाजपने बहुमता आकडा सहजपणे ओलांडला आहे. बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये एनडीए बहुमताच्या जवळ पोहोचले आहे. बिहार निवडणूक (Bihar Election) निकालांमध्ये तेजस्वी यादव यांच्या महागठबंधनची मोठी घसरण दिसून येत आहे.
हे ही वाचा :
