Bihar Election Vote Counting: बिहारमधील निकाल फिरणार? आघाडीवरील भाजपच्या या जागांवर उलटफेर होणार?
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Bihar Election Vote Counting : निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार पहिल्या फेरीची मतमोजणी पूर्ण झाली आहे. सुरुवातीच्या मतमोजणीमध्ये भाजपच्या जागांमध्ये उलटफेर होण्याची शक्यता आहे.
पाटणा: बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणी सुरू झाली आहे. निकालाच्या पहिल्या तासाभरानंतरच्या कलात सत्ताधारी एनडीएने बहुमतांसह आघाडी घेतली आहे. मतमोजणी सुरू असून निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार पहिल्या फेरीची मतमोजणी पूर्ण झाली आहे. सुरुवातीच्या मतमोजणीमध्ये भाजपच्या जागांमध्ये उलटफेर होण्याची शक्यता आहे.
बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार आपली सत्ता कायम राखणार की तेजस्वी यादव सत्तांतर घडवणार याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या होत्या. या निवडणुकीत सत्ताधारी एनडीए आणि महागठबंधन यांच्यात महत्त्वाची लढत आहे. तिसरा पक्ष जनसुराज देखील पहिल्यांदाच निवडणूक रिंगणात उतरलाय. बिहार विधानसभेत एकूण 243 जागा आहेत. मात्र, सुरुवातीच्या दीड तासांच्या कलांमध्ये जेडीयू आणि भाजपने बहुमता आकडा सहजपणे ओलांडला आहे.
advertisement
निवडणूक आयोगाने पहिल्या फेरीची मतमोजणी आपल्या संकेतस्थळावर जाहीर केली आहे. भाजपने ५१ जागांवर आघाडीवर घेतली आहे. मात्र, यातील काही जागांवर चुरशीची लढाई दिसून येत आहे. काही जागांवरील मतांचे अंतर हे एक हजार मतांपेक्षा कमी आहे. त्यामुळे या ठिकाणचे चित्र बदलणार की भाजप आघाडी वाढवणार याकडे लक्ष लागले आहे.

advertisement



२०२५ च्या बिहार निवडणूक निकालांचे सर्व ट्रेंड results.eci.gov.in वर उपलब्ध आहेत. बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये एनडीए बहुमताच्या जवळ पोहोचले आहे. बिहार निवडणूक निकालांमध्ये तेजस्वी यादव यांच्या महागठबंधनची मोठी घसरण दिसून येत आहे.
view commentsLocation :
Bihar
First Published :
November 14, 2025 10:06 AM IST
मराठी बातम्या/देश/
Bihar Election Vote Counting: बिहारमधील निकाल फिरणार? आघाडीवरील भाजपच्या या जागांवर उलटफेर होणार?


