बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार आपली सत्ता कायम राखणार की तेजस्वी यादव सत्तांतर घडवणार याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या होत्या. या निवडणुकीत सत्ताधारी एनडीए आणि महागठबंधन यांच्यात महत्त्वाची लढत आहे. तिसरा पक्ष जनसुराज देखील पहिल्यांदाच निवडणूक रिंगणात उतरलाय. बिहार विधानसभेत एकूण 243 जागा आहेत. मात्र, सुरुवातीच्या दीड तासांच्या कलांमध्ये जेडीयू आणि भाजपने बहुमता आकडा सहजपणे ओलांडला आहे.
advertisement
निवडणूक आयोगाने पहिल्या फेरीची मतमोजणी आपल्या संकेतस्थळावर जाहीर केली आहे. भाजपने ५१ जागांवर आघाडीवर घेतली आहे. मात्र, यातील काही जागांवर चुरशीची लढाई दिसून येत आहे. काही जागांवरील मतांचे अंतर हे एक हजार मतांपेक्षा कमी आहे. त्यामुळे या ठिकाणचे चित्र बदलणार की भाजप आघाडी वाढवणार याकडे लक्ष लागले आहे.
२०२५ च्या बिहार निवडणूक निकालांचे सर्व ट्रेंड results.eci.gov.in वर उपलब्ध आहेत. बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये एनडीए बहुमताच्या जवळ पोहोचले आहे. बिहार निवडणूक निकालांमध्ये तेजस्वी यादव यांच्या महागठबंधनची मोठी घसरण दिसून येत आहे.
