एलॉन मस्क का सापडले वादात?
वास्तविक, एलॉन मस्क यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील एका पोस्टमध्ये इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे हटवावीत करावीत, असे म्हटले होते. कारण मानव किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात एआयद्वारे ते हॅक होण्याचा धोका अजूनही खूप जास्त आहे. एलॉन मस्क यांनी प्यूर्टो रिकोच्याम प्राथमिक निवडणुकांवर ही प्रतिक्रिया दिली, ज्यात मतदानातील अनियमितता समोर आली होती. त्यांच्या पोस्टवर प्रतिक्रिया देताना राजीव चंद्रशेखर यांना हा दावा फेटाळून लावला. माजी केंद्रीय मंत्री म्हणाले, "हे एक अतिशय सामान्य विधान आहे, याचा अर्थ असा आहे की कोणीही सुरक्षित डिजिटल हार्डवेअर बनवू शकत नाही. हे चुकीचे आहे."
advertisement
चंद्रशेखर म्हणाले की, एलॉन मस्कचे विचार यूएस आणि इतर ठिकाणी लागू होऊ शकतील, जिथे ते इंटरनेट-कनेक्टेड मतदान यंत्रे तयार करण्यासाठी नियमित संगणकीय प्लॅटफॉर्म वापरतात. मात्र, भारतात हे शक्य नाही. भारतीय ईव्हीएम कस्टम-डिझाइन केलेले, सुरक्षित आणि कोणत्याही नेटवर्क किंवा मीडियापासून वेगळे असल्याचा दावा चंद्रशेखर यांनी केला.
भारतीय ईव्हीएममध्ये कोणतीही कनेक्टिव्हिटी नाही, ब्लूटूथ, वाय-फाय किंवा इंटरनेट असा कोणताही मार्ग नाही. फॅक्टरी-प्रोग्राम केलेले नियंत्रक जे पुन्हा प्रोग्राम केले जाऊ शकत नाहीत, अशी माहिती चंद्रशेखर यांनी दिली. भारताप्रमाणे इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे तुम्हालाही तयार करता येऊ शकतात. आणि हे तंत्रज्ञान शिकवण्याव आम्हाला आनंद होईल.”
अखिलेश यादव यांची ईव्हीएमवर प्रतिक्रिया
‘तंत्रज्ञान’ हे समस्या सोडवण्यासाठी आहे, जर ते समस्यांचे कारण बनत असेल तर त्याचा वापर बंद केला पाहिजे, अशी प्रतिक्रिया सपाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी दिली आहे. आज जेव्हा जगभरातील अनेक निवडणुकांमध्ये ईव्हीएममध्ये छेडछाड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जगातील नामवंत तंत्रज्ञान तज्ज्ञ ईव्हीएममधील फेरफाराच्या धोक्याबद्दल उघडपणे लिहित आहेत, तेव्हा भाजपने ईव्हीएम वापरण्याचा आग्रह धरण्याचे कारण काय? हे त्यांनी स्पष्ट केले पाहिजे. आगामी सर्व निवडणुका बॅलेट पेपरच्या माध्यमातून घेण्याची आमची मागणी आहे, असंही अखिलेश यादव यांनी सोशल मीडियाद्वारे म्हटले आहे.
वाचा - 'लोकसभेवेळी सोलापुरात होता मोठा प्लॅन' प्रणिती शिंदेंचा फडणवीसांवर गंभीर आरोप
एलॉन मस्क यांच्या एका ट्विटमुळे नव्या शिळ्या कढीला ऊत येणार आहे.