Praniti Shinde : 'लोकसभेवेळी सोलापुरात होता मोठा प्लॅन' प्रणिती शिंदेंचा फडणवीसांवर गंभीर आरोप

Last Updated:

Praniti Shinde : सोलापूर लोकसभा निवडणुकीदरम्यान भाजपचा दंगल करण्याचा प्लॅन होता, असा गंभीर आरोप खासदार प्रणिती शिंदे यांनी केला आहे.

प्रणिती शिंदेंचा फडणवीसांवर गंभीर आरोप
प्रणिती शिंदेंचा फडणवीसांवर गंभीर आरोप
सोलापूर : काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत. लोकसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री फडणवीस आणि त्यांच्या पिल्लावलींचा सोलापुरात दंगली घडवण्याचा प्लॅन होता, असं धक्कादायक वक्तव्य प्रणिती शिंदे यांनी केलं आहे. शिंदे यांच्या आरोपांनंतर आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर कृतज्ञता मेळाव्यात खासदार प्रणिती शिंदे यांनी सोलापुरात जाहीर सभेला संबोधित केलं. या सभेतून प्रणिती शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले. मतदानाच्या दोन दिवस आधी भाजप सोलापुरात दंगल लावणार होते. भाजपवाल्यांना लाज वाटायला पाहिजे. रक्ताने राजकारण करतात ही लोकं, असा गंभीर आरोप शिंदे यांनी फडणवीस आणि भाजपवर केला आहे.
advertisement
सोलापूर लोकसभा निवडणूक काळात ते गावामध्ये जिल्ह्यात येऊन भांडण आणि दंगल लावण्याचा प्रयत्न करणार होते. मतदानाच्या दिवशी पोलिंगवर काय झालं होतं? सीपींनी सांगितलं होतं, जा बाहेर नाहीतर उमेदवारावर एफआयआर करावा लागेल. त्यावेळेस भाजपवाल्यांना कळलं होतं निवडणूक आपल्या हातातून गेली आहे. आता एकच उपाय आहे दंगल लावा. निवडणुकीत लोकांमध्ये विभागणी करा आणि निवडून या असं त्यांना सांगण्यात आलं होतं. त्यांची पाच दिवस अगोदरची भाषण काढून बघा, असं आव्हानही शिंदे यांनी दिलं आहे.
advertisement
इतके दिवस गप्प का? रामदास कदम
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप सोलापुरात दंगल घडवणार असल्याचा आरोप खासदार प्रणिती शिंदे यांनी केला आहे. यावर आता भाजपची प्रतिक्रिया आली आहे. शिंदे यांच्याकडे पुरावे होते, तर ते इतके दिवस गप्प का होते? असा पलटवार भाजप आमदार राम कदम यांनी केला आहे. लोकसभा निवडणूक झाल्यानंतर निकालापर्यंत वाट का पाहिली? त्याचवेळी तक्रार दाखल का नाही केली? असा उलट सवाल रामदास कदम यांनी केला
मराठी बातम्या/महाराष्ट्र/सोलापूर/
Praniti Shinde : 'लोकसभेवेळी सोलापुरात होता मोठा प्लॅन' प्रणिती शिंदेंचा फडणवीसांवर गंभीर आरोप
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement