advertisement

Uddhav Thackeray : 'दरवाजा उघडा..' उद्धव ठाकरेंच्या 'त्या' वक्तव्यावर शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया

Last Updated:

Uddhav Thackeray : पक्षातून गेलेल्या लोकांना परत घेणार नसल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. यावर आता शिवसेनेची प्रतिक्रिया आली आहे.

News18
News18
छत्रपती संभाजीनगर : पक्षातून गेलेल्या लोकांना परत घेणार नसल्याची भूमिका उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतली. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी मोठं यश मिळालं आहे. आता महाविकास आघाडीने विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. त्यासाठी शनिवारी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार), शिवसेना (उबाठा) या तिन्ही पक्षांची प्राथमिक बैठक झाली. या बैठकीत लोकसभेपेक्षा अधिक ताकदीने विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यांची माहिती महविकास आघाडीच्या नेत्यांनी पत्रकार परिषदेतून दिली. यावर आता शिवसेना शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले उदय सामंत?
ज्यांना जनतेने बेदखल केले त्यांच्या बोलण्याची आम्ही दखल घेणार नाही. हे मनोज जरांगे पाटील यांच्या साक्षीने सांगतो, असा पलटवार मंत्री उदय सामंत यांनी केला आहे. दरवाजा उघडा असे आम्ही त्यांना सांगितले नाही. आम्ही जाणार, आम्हाला घेणार असे काही चित्र नाही. उलट शिंदे साहेबांचा दरवाजा अनेकांसाठी उघडा आहे. त्यांचे अनेकजण आमच्याकडे येतील. मतांची सूज त्यांना आली आहे असे दिसते. स्वतः ठाकरेंचे लोक आमच्या संपर्कात आहे. म्हणून ते झाकण्यासाठी असे बोलत असल्याचा टोला सामंत यांनी लगावला.
advertisement
संजय शिरसाठ काय म्हणाले?
उद्धव ठाकरे यांनी आम्ही कुणालाही परत घेणार नाही असं म्हटलं आहे. पण जातंय कोण यादी तर द्या? जिथं पाणी थांबत नाही तिथं कुणी पाणी भरायला जात नाही. तुमच्या कडची लोक इथे येतील, त्यांनी त्यांचे लोक सांभाळावे, असा टोलाही संजय शिरसाठ यांनी लगावला आहे. कसले यांचे सरकार येणार? यांची महाविकास आघाडी टिकणार नाही, असा दावाही संजय शिरसाठ यांनी केला आहे.
advertisement
शिवसेना नेत्यांनी घेतील जरांगेंची भेट
मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी संभाजीनगरमध्ये आज राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत, शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट आणि संभाजीनगरचे पालकमंत्री यांनी जरांगे यांची हॉस्पिटलमध्ये भेट घेतली. यावेळी त्यांनी आरक्षणासाठी राज्य सरकार काम करत आहे, असे आश्वासन जरांगे यांना दिले.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Uddhav Thackeray : 'दरवाजा उघडा..' उद्धव ठाकरेंच्या 'त्या' वक्तव्यावर शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया
Next Article
advertisement
Gold Silver Price:  ट्रम्प यांची एक धमकी अन् बाजारात उलथापालथ, सोन्यानं गाठला रेकोर्ड ब्रेक दर, चांदीही महागली, एक्सपर्ट म्हणतात, 'आता...'
ट्रम्प यांची एक धमकी अन् बाजारात उलथापालथ, सोन्यानं गाठला रेकोर्ड ब्रेक दर, चां
  • मागील काही दिवसांपासून सोनं-चांदीच्या दरात तुफान तेजी आली आहे.

  • सोनं-चांदीचे दर नवीन उच्चांक गाठत आहेत.

  • आज, जागतिक बाजारपेठेत सध्या सोन्याने सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत.

View All
advertisement