मुजफ्फरपुर : प्रेमप्रकरणाच्या विविध बातम्या सध्या येत राहतात. अनेकांचे प्रेमप्रकरण यशस्वी होते. तर काहींचे प्रेमप्रकरण हे यशस्वी होत नाही. मात्र, मियां-बीबी हो राजी तो क्या करेगा काजी, अशी एक हिंदीमध्ये म्हण आहे. तुम्ही ही म्हण नक्कीच ऐकली असेल. अशीच एक घटना समोर आली आहे. या घटनेची सर्वत्र चर्चा होत आहे.
advertisement
एक तरुण आणि एक तरुणी दोन्ही एकमेकांच्या प्रेमात होते. दोघांना लग्न करायचे होते. मात्र, त्यांचे कुटुंबीय त्यांच्या लग्नासाठी तयार नव्हते. मुलाच्या आईच्या या लग्नाला विरोधत होता. मात्र, हे प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचल्यावर मुलांच्या घरच्यांनी या लग्नाला होकार दिला. यानंतर पोलिसांच्या उपस्थितीत दोघांचे लग्न झाले.
नेमकं काय घडलं -
बिहारच्या मुजफ्फरपुरच्या अनुज कश्यप हा तीन वर्षांपूर्वी आपल्या मावशीकडे बेतिया गेला होता. याठिकाणी त्याची भेट अनिता सोबत झाली. यानंतर दोघांमध्ये संवाद सुरू झाला. यानंतर त्यांच्यातील मैत्रीचे रुपांतर हे प्रेमात झाले. अनिताला भेटण्यासाठी अनुज कधी बेतियाला यायचा. तर कधी अनिता ही अनुजला भेटण्यासाठी मुजफ्फरपुर यायची.
22 जानेवारीला जय श्रीराम म्हणा आणि खा पोटभर पाणीपुरी, दुकानदाराची अनोखी ऑफर
दोघांना लग्नही करायचे होते. अनिताच्या कुटुंबीयांचा या लग्नाला होकार होता. मात्र, अनुजची आई या लग्नाला नकार देत होती. यानंतर अनिताच्या कुटुंबीयांनी अनुजच्या कुटुंबीयांशी चर्चा केली. मात्र, त्यांनी लग्नास नकार दिला. त्यानंतर अनिताने मुजफ्फरपूर महिला पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. मात्र, पोलिसांनी समजावून सांगितल्यानंतर त्यांनीही होकार दिला. यानंतर पोलिसांच्या उपस्थितीत गरीबनाथ मंदिरात त्यांचे लग्न झाले.
