काही क्षणातच आगीचा भडका उडाला आणि संपूर्ण बस आगीच्या भक्ष्यस्थानी होती. ज्वाळा इतक्या भयंकर होत्या की आजूबाजूच्या स्थानिकांनाही मदत करणं कठीण होत होतं. जीव वाचवण्यासाठी बसमधून लोक ओरडत होते. किंकाळ्या ऐकू येत होत्या. काळीज चिरणारा आक्रोश महामार्गावर रात्री उशीरा स्थानिकांनी पाहिला. संपूर्ण बस जळून खाक झाली, फक्त सांगाडा उरला. ही आग इतकी भीषण होती की त्यात सारं काही जळून बेचिराख झालं.
advertisement
ही धक्कादायक घटना आंध्र प्रदेशातील कुर्नूल इथे घडली आहे. बसला आग लागेल्या घटनेत अनेक जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. कावेरी ट्रॅव्हल्स या बसला आग लागली. पोलिसांच्या माहितीनुसार, अपघाताच्या वेळी चालक आणि सहाय्यकासह ४२ जण होते. एसपींनी सांगितले की, दुचाकीला धडक दिल्यानंतर बसने आग लावली. आतापर्यंत 12 जणांना रुग्णालयात हलवण्यात आले आहे. सध्या आग आटोक्यात आणण्यात आली आहे. कूलिंगचे काम सुरू आहे.
आतापर्यंत 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला आहे. पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास ही भीषण आग लागली. पहाटे तीन वाजता अनेक प्रवासी झोपत होते त्यामुळे त्यांना काय झालंय हे कळण्याच्या आतच आगीने आपलं रौद्र रुप धारण केलं. तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी या अपघाताबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले. मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या कुटुंबियांना मनापासून संवेदना व्यक्त केल्या. त्यांनी राज्य अधिकाऱ्यांना आंध्र प्रदेश अधिकाऱ्यांशी समन्वय साधून आवश्यक मदत उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.
त्यांनी राज्याचे मुख्य सचिव के. रामकृष्ण राव आणि पोलिस महासंचालक (डीजीपी) बी. शिवधर रेड्डी यांच्याशी अपघाताबाबत चर्चा केली आणि तातडीने हेल्पलाइन सुरू करण्याची सूचना केली. गडवाल जिल्हाधिकाऱ्यांना आणि पोलिस अधीक्षकांना (एसपी) अपघातस्थळी भेट देण्याच्या सूचना देण्यात आल्या.
