प्रसिद्ध गीतकार आणि बॉलिवूड चित्रपटांचे लेखक मनोज मुंतशिर यांनी मुस्लिम व्यक्तींसाठी कुंभ एक पिकनिक स्पॉट पेक्षा काही वेगळे नाही त्यामुळे त्यांनी महाकुंभ मेळ्यात येण्याची गरज नाही. मुंतशिर यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे एका नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. कुंभ मेळाव्यात मुस्लिम व्यक्तींना देण्यापासून बंदी घालणे हे चुकीचे आहे असा आरोप करणाऱ्यांना मुंतशिर यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून उत्तर दिले आहे.
advertisement
याबाबत मुंतशिर यांनी पाच प्रश्न उपस्थित केले आहेत. इस्लाममध्ये मूर्ती पुजा मान्य आहे का? समुद्र मंथनातून बाहेर आलेले अमृत प्रयागराजमध्ये पडले होते हे मुस्लीम मान्य करतात का? गंगा, यमुना आणि सरस्वती यांच्या त्रिवेणी संगमाचा मुस्लिम साहित्यात काही तरी महत्त्व आहे का? नागा साधूंच्या दर्शनाने पापांपासून मुक्ती मिळते हे ते मान्य करतात का? मकर संक्रांत आणि मौनी अमावस्या यांचा काही तरी उल्लेख इस्लाममध्ये आहे का? या पाच पैकी एकाही प्रश्नाचे उत्तर हो असेल तर मी स्वत:सरकारला पत्र लिहून मुस्लिम बंधू आणि भगिणींना कुंभमध्ये येण्यास परवनागी द्यावी, अशी मागणी करेन.
कुंभ मेळ्यासाठी आम्ही १२ वर्ष प्रतिक्षा करतो, असे ही मुंतशिर म्हणाले आहेत. ही गोष्ट आमच्यासाठी पवित्र आणि महत्त्वाची आहे. याची प्रतिक्षा हिंदू धर्मातील अनेक जेष्ठ नागरिक करत असतात असेही मुंतशिर यांनी म्हटले आहे.
