पाकिस्तानसाठी हेरगिरी करणारा मोती राम जाट हा CRPF च्या ११६ व्या बटालियनमध्ये कार्यरत होता. त्याने विविध माध्यमांतून पाकिस्तानी अधिकाऱ्यांकडून पैसे घेतले. मोती राम जाट याने भारतीय सैन्याच्या हालचाली, तळांची माहिती आणि सुरक्षा योजनांची माहिती पाकिस्तानला पुरवल्याचा आरोप आहे. या प्रकरणात न्यायालयाने त्याला ६ जूनपर्यंत कोठडी सुनावली आहे.
पहलगाम हल्ल्याशी कनेक्शन?
advertisement
सीआरपीएफचा आरोपी जवान मोती राम जाट याचा पहलगाम हल्ल्याशी कनेक्शन आहे का, याचीही चौकशी केली जात आहे. आरोपी मोती राम जाट हा पहलगाममध्येच तैनात होता. २२ एप्रिल २०२५ रोजी झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या सहा दिवस आधीच त्यांची तिथून बदली करण्यात आली होती. त्यामुळे त्याने पाकिस्तानला दिलेल्या माहितीचा आणि पहलगाम हल्ल्याचा काही संबंध आहे का, याचाही कसून तपास होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, मोती राम जाट याला अटक करण्यात आल्यानंतर सीआरपीएफने त्याची नोकरीवरून हकालपट्टी केली आहे. मोती राम हा पाकिस्तानच्या मोठ्या हेरगिरी रॅकेटचा भाग असण्याची शक्यता आहे. मागील काही दिवसात युट्युबर आणि इतरांना पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपात अटक करण्यात आली आहे.