TRENDING:

Delhi Election Result : 'आप'ची टॉप ऑर्डर फेल, केजरीवाल, सिसोदियांसह कोणाचा झाला पराभव? पाहा यादी

Last Updated:

Delhi Election Results : दिल्लीच्या सत्तेत 2013 पासून असणाऱ्या आम आदमी पक्षाला पराभवाचा मोठा झटका बसला आहे. या निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांच्यासह आम आदमी पक्षाच्या दिग्गज नेत्यांना पराभवाचा धक्का बसला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली: दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल जवळपास स्पष्ट झाला आहे. विद्यमान सत्ताधारी आम आदमी पक्षाला आता सत्तेतून पायउतार व्हावे लागणार आहे. भाजपने जोरदार मुसंडी मारत दिल्लीची सत्ता काबीज केली आहे. तर, दुसरीकडे काँग्रेसला भोपळाही फोडता आला नाही. दिल्लीच्या सत्तेत 2013 पासून असणाऱ्या आम आदमी पक्षाला पराभवाचा मोठा झटका बसला आहे. या निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांच्यासह आम आदमी पक्षाच्या दिग्गज नेत्यांना पराभवाचा धक्का बसला आहे.
'आप'ची टॉप ऑर्डर फेल, केजरीवाल, सिसोदियांसह कोणाचा झाला पराभव? पाहा यादी
'आप'ची टॉप ऑर्डर फेल, केजरीवाल, सिसोदियांसह कोणाचा झाला पराभव? पाहा यादी
advertisement

भाजपने सध्या बहुमताचा आकडा पार केला असून 46 जागांवर आघाडी मिळवली आहे. सलग तीन वेळा दिल्ली काबीज करणाऱ्या आम आदमी पार्टीला यंदाच्या निवडणुकीत दारुण पराभवाचा सामना करावा लागत आहे. आप केवळ 22 जागांवर आघाडीवर आहे.

'आप'च्या कोणत्या दिग्गज उमेदवारांचा पराभव?

नवी दिल्ली मतदारसंघातून आम आदमी पक्षाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा पराभव झाला आहे. भाजपचे परवेश वर्मा यांनी केजरीवालांचा सुमारे दोन हजारांच्या मताधिक्याने पराभव केला आहे. नवी दिल्ली मतदारसंघात चुरशीची लढत झाली. आपच्या अरविंद केजरीवाल यांना भाजपचे परवेश वर्मा आणि काँग्रेसचे संदीप दीक्षित यांचे आव्हान होते. संदीप दीक्षित हे तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले. अरविंद केजरीवाल यांचा सुमारे 1800 मतांच्या फरकाने पराभव झाला. याच मतदारसंघात काँग्रेसच्या संदीप दीक्षित यांना 4000 च्या आसपास मते मिळाली. अरविंद केजरीवाल यांनी 2013 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या दिग्गज नेत्या आणि तत्कालीन मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. त्यावेळी केजरीवालांनी दीक्षितांचा पराभव केला होता. त्यानंतर काँग्रेसची या मतदारसंघात पिछेहाट दिसून आली.

advertisement

आपचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांचाही पराभव झाला आहे. जंगपुरा मतदारसंघातून त्यांना पराभवाचा धक्का बसला आहे. जंगपुरामधून सिसोदिया यांना जवळपास 600 मतांनी पराभवाचा धक्का बसला. दिल्लीचे शिक्षण मंत्री असताना त्यांनी एक मॉडेल उभारले होते. त्याच्या परिणामी शासकीय शाळांचा चेहरामोहरा बदलून गेला होता. कथित दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणी सिसोदियांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली.

advertisement

ग्रेटर कैलास मतदारसंघातून सौरभ भारद्वाज यांनाही पराभवाचा धक्का बसला. ग्रेटर कैलासमध्ये भाजपच्या शिखा रॉय यांनी त्यांचा 3188 मतांनी पराभव केला. या ठिकाणी काँग्रेस उमेदवाराने 6000 हून अधिक मते घेतली.

शकूरबस्ती मतदारसंघातून सत्येंद्र जैन यांना पराभवाचा धक्का बसला. भाजपच्या कर्नाल सिंह यांनी जैन यांचा 20 हजार 998 मतांनी पराभव केला. सत्येंद्र जैन यांनाही मद्य घोटाळा प्रकरणी अटक करण्यात आली होती.

advertisement

मालवीयनगर मतदारसंघातून सोमनाथ भारती यांना देखील पराभवाचा धक्का बसला. भाजपच्या सतीश उपाध्याय यांनी भारती यांचा 2131 मतांनी पराभव केला. या ठिकाणी काँग्रेस उमेदवाराने 6770 मते मिळवली.

फक्त आतिशी विजयी...

निवडणुकीत एकीकडे आपचे दिग्गज नेत्यांना पराभवाचा धक्का बसत असताना दुसरीकडे दिल्लीच्या मावळत्या मुख्यमंत्री आतिशी यांचा निसटता विजय झाला आहे. आतिशी यांनी कालकाजी मतदारसंघातून विजय मिळवला. भाजप उमेदवार रमेश बिदुरी यांचा 3521 मतांनी पराभव केला.

advertisement

इतर संबंधित बातमी :

AAP vs Congress : 'आप'ने 4 राज्यात खेळ बिघडवला, काँग्रेसने एकच धक्का मारला; मतदानाची आकडेवारी काय सांगते?

मराठी बातम्या/देश/
Delhi Election Result : 'आप'ची टॉप ऑर्डर फेल, केजरीवाल, सिसोदियांसह कोणाचा झाला पराभव? पाहा यादी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल