आग्रा-लखनऊ एक्सप्रेसवेवरील आग्रा आणि लखनऊ या टोल नाक्यावरील टोल कर्मचाऱ्यांना मालकाने दिवाळी बोनसच दिलासा नव्हता.त्यामुळे कर्मचारी प्रचंड नाराज झाले होते.त्यामुळे या नाराजीतून कर्मचाऱ्यांनी शनिवारी रात्री कामावर बहिष्कार टाकला होता. विशेष म्हणजे नुसता कामावर बहिष्कार टाकला नाही तर त्यांना टोल नाक्यावरी बॅरीकेटस हटवून टाकले होते.त्यामुळे हजारो टोल न भरताच निघून गेल्या होत्या. त्यामुळे मालकाला याचा मोठा फटका बसला होता.
advertisement
एक्सप्रेसवेवरील टोल ऑपरेशन्सचे कंत्राट श्री साई आणि दातार यांच्याकडे होते. या कंत्राटदाराने 1100 रूपयांचा दिवाळी बोनस टोल कर्मचाऱ्यांसाठी जाहीर केला होता. पण बोनसची रक्कम ऐकताच टोल कर्मचारी प्रचंड भडकले होते. आणि त्यांना थेट आंदोलनाचा पावित्रा घेता शनिवारी रात्री 10 वाजेपासून लखनऊ टोलवरील कामावर बहिष्कार टाकला.यावेळी कर्मचाऱ्यांनी बॅरीकेटस देखील हटवली होती. त्यामुळे आग्र्याकडे जाणारी वाहने टोल टॅक्स न भरताच जात होती. या घटनेची माहिती मिळताच अधिकाऱ्यांनी तत्काळ संतप्त कर्मचाऱ्यांशी बोलणी सूरू केली. त्यानंतर कर्मचारी मध्यरात्री १२ वाजता कामावर परतले.
कर्मचाऱ्यांचा दावा होता की गेल्या वर्षी कंपनीने त्यांना पाच हजार रुपयांचा बोनस दिला होता, परंतु यावेळी त्यांची फसवणूक होत आहे. टोल फ्री स्थिती कळताच, अधिकाऱ्यांनी त्यांच्याशी संपर्क साधला, परंतु प्रकरण निष्फळ ठरले. परिस्थिती हाताळण्यासाठी इतर टोल प्लाझावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना बोलावण्यात आले, परंतु त्यांना स्थानिक कर्मचाऱ्यांसोबत काम करण्याची परवानगी देण्यात आली नाही.
रविवारी सकाळी कंपनीचे प्रकल्प व्यवस्थापक कृष्णा जुरैल यांनी कर्मचाऱ्यांना 10 टक्के वेतनवाढीचे आश्वासन दिले. त्यानंतर कर्मचारी सकाळी 10 वाजता कामावर परतले.पण कर्मचारी परतण्याआधी लखनऊहून येणारी पाच हजारांहून अधिक वाहने टोल टॅक्स न भरताच पुढे गेल्याची माहिती आहे.पण प्रकल्प व्यवस्थापक जुरैल यांनी हा दावा खोडून काढत फास्टॅग स्कॅनर काम करत असल्याची माहिती दिली.
किती टोल होता?
एक्सप्रेस वेवर आग्रा ते लखनऊ टोल नाक्यांवर कारसाठी एकतर्फी कर 665 इतका टोल आकारला जातो. टोल कर बाहेर पडण्याच्या ठिकाणी वसूल केला जातो. लखनऊहून आग्र्याला येणाऱ्या वाहनांना आग्र्यात आकारले जाईल, तर आग्र्याहून लखनऊला जाणाऱ्या वाहनांना लखनौ टोल प्लाझावर आकारले जाईल.