ढगफुटी पावसामुळे 10 पेक्षा जास्त घरं वाहून गेल्याची माहिती मिळाली आहे. अचानक नदीच्या पातळीत वाढ झाली आणि जे दिसेल ते घेऊन नदीनं रौद्र रुप धारण केलं. घरं, झाडं जे वाटेत येईल ते सगळं बेचिराख करत गेली. ढगफुटीमुळे नदी, नाले यांना महापूर आला, धोक्याची पातळी ओलांडली असून अनेक भागांमधून लोकांना बाहेर काढलं जात आहे. पावसामुळे बचावकार्यात अडचणी येत असल्याची माहिती मिळाली आहे.
advertisement
खराब हवामान, सध्याची परिस्थिती पाहता वैष्णव देवी यात्रा अनिश्चित काळासाठी थांबवण्यात आली आहे. काही ठिकाणी दरड देखील कोसळली आहे. नदीच्या प्रवाहातून मोठे दगड देखील वाहून आले आहेत. घरांचं गाड्यांचं मोठं नुकसान झालं आहे. कठुआ, मनाली, जम्मू, काश्मीर या भागांमधील नद्या पात्र सोडून वाहात आहेत. धोक्याची पातळी ओलांडली असून रौद्र रुप घेतलं आहे. रस्ते जलमय झाले आहेत. सध्या या भागांमधील परिस्थिती भीषण आहे.