E20 पेट्रोल म्हणजे काय? (What is E20 in petrol?)
E20 पेट्रोल म्हणजे 80% साधे पेट्रोल आणि 20% इथेनॉलचे मिश्रण. इथेनॉल ऊस आणि धान्यांपासून तयार होते. हे इंधन प्रदूषण कमी करते, शेतकऱ्यांना फायदा देते आणि परकीय तेल आयात कमी करते.
गाड्या खरोखर बंद होऊ लागल्या आहेत का? (E20 affect vehicle engine)
advertisement
सध्या तरी मोठ्या प्रमाणात गाड्या अचानक बंद होतात अशी अधिकृत किंवा गंभीर नोंद झालेली नाही. सरकार, वाहन उद्योग संस्था (SIAM) आणि ARAI यांनी स्पष्ट केलं आहे की E20 वापरामुळे सुरक्षेचा धोका नाही.
पण जुन्या आणि E20-रेडी नसलेल्या वाहनांमध्ये इंजिनची झीज, गॅस्केट खराब होणं किंवा सुरुवातीला परफॉर्मन्स कमी होणं यांसारख्या समस्या आढळू शकतात. त्यामुळे "गाडी बंद पडते" हा दावा केला जात आहे. पण हे खरं नाही, असं असलं तरी तज्ज्ञांनी जुन्या वाहनधारकांनी सावध राहणं गरजेचं आहे.
E20 पेट्रोल का विकला जातोय? याचे फायदे काय? (e20 petrol benefits)
पर्यावरण संरक्षण इथेनॉल मिसळल्याने CO₂ उत्सर्जन कमी होतं. ऊश शेतकऱ्यांना थेट फायदा होईल त्यांच्यासाठीी नवीन बाजारपेठ तयार होते.
एवढ नाही तर पेट्रोलमध्ये इथनॉल मिसळल्यामुळे कच्च्या तेलाची आयात कमी होईल, ज्यामुळे देशाचा खर्च वाचेल. इथेनॉलमुळे काही इंजिनांचे परफॉर्मन्स सुधारते. भारताच्या ग्रीन एनर्जी धोरणातील देखील ही महत्त्वाची पायरी आहे. कारण E20 पेट्रोलमुळे कार्बनचा उत्सर्जन देखील कमी होणार आहे.
E20 पेट्रोलमुळे होणारे नुकसान (e20 petrol disadvantages)
विविध अहवालांनुसार वाहनांचे मायलेज साधारण 2% ते 6% कमी होते. जुन्या वाहनांमध्ये रबर, प्लास्टिक वा मेटल पार्ट्सवर इथेनॉलचा प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. काही प्रकरणांत हार्ड स्टार्ट, गाडी जास्त आवाज करणे किंवा इंजिनची झीज यांसारखे आजार उद्भवतात.
कोणत्या गाड्या E20 साठी रेडी आहेत? याबाबत पुरेशी माहिती नसल्याने तक्रारी वाढत आहेत.
इथेनॉलची ऊर्जा पेट्रोलपेक्षा कमी असल्याने जास्त इंधन जाळावे लागते. परिणामी, 1 लिटर पेट्रोलमध्ये वाहन कमी अंतर पार करते. 2022 नंतरच्या E20-रेडी इंजिनांमध्ये मायलेजचा तोटा तुलनेने कमी (2-4%) आहे. तर जुन्या इंजिनांमध्ये हा तोटा अधिक जाणवतो.
E20 पेट्रोल हे भारताच्या स्वच्छ उर्जेच्या प्रवासातील महत्त्वाचे पाऊल आहे. हे इंधन पर्यावरणास, देशाच्या परकीय चलनाला आणि शेतकऱ्यांना लाभदायक ठरणारे आहे. मात्र, ग्राहकांच्या दृष्टीने मायलेज कमी होणे आणि जुन्या वाहनांमध्ये संभाव्य समस्या ही आव्हाने आहेत. त्यामुळे नवीन E20-रेडी वाहनांमध्ये या इंधनाचा वापर सुरक्षित आणि उपयुक्त ठरेल, तर जुन्या वाहनधारकांनी कंपनीच्या सूचना आणि सर्व्हिसिंग तपासूनच E20 वापरण्याचा निर्णय घ्यावा.
E20 बद्दल महत्वाची माहिती
1 सप्टेंबरला भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) एका जनहित याचिकेला नाकारले ज्यात 20% इथेनॉल-मिश्रित पेट्रोल (E20) लागू करण्याच्या निर्णयाला विरोध करण्यात आला होता. याचिकेने मागणी केली होती की वाहनधारकांना इथेनॉल–मुक्त (E0) पेट्रोल घेण्याचा पर्याय मिळावा, तसेच पेट्रोल पंपांवर इथेनॉलचे प्रमाण स्पष्टपणे दिले जावे. पण सर्वोच्च न्यायालयाने हे सर्व मागण्या खारिज करत E20 चालू ठेवण्यास कोर्ट मंजुरी देत निर्णय दिला.