मिळालेल्या माहितीनुसार, गुप्तार घाट ते नव्या घाटापर्यंत 20 एकर जागेत कमळाच्या आकाराचं कारंजं बांधण्याची संकल्पना आहे. हे कारंजं 50 मीटर उंचीपर्यंत पाणी फवारणार आहे. कारंज्याचं संकुल भाविकांना दिव्य आणि आध्यात्मिक अनुभव देण्यासाठी बांधलं जाईल. यामुळे श्री राम मंदिराची भव्यता आणखी वाढेल.
श्री राम मंदिराच्या संपूर्ण संकल्पनेत जलतत्त्वांच्या महत्त्वाला विशेष नवी ओळख देण्याचा हा प्रयत्न आहे. मंदिर परिसरातील या भागाला केवळ वेटिंग एरियापर्यंत मर्यादित न ठेवता, अध्यात्मिक प्रेरणेच्या आणि आरामदायी ठिकाणात रूपांतरित करणं हा या कारंज्याच्या निर्मितीचा उद्देश आहे. मंदिराला पूरक अशा कारंज्याची निर्मिती केली जाईल. हा परिसर भगवान रामाची महाकथा सांगण्यासाठी एक योग्य ठिकाण म्हणूनदेखील ओळखलं जाईल. या ठिकाणी यात्रेकरू आणि पर्यटक दोघांनाही एक अविस्मरणीय अनुभव मिळेल. आलेल्या भाविकांना जलतत्त्वाच्या मदतीनं मन:शांती मिळेल आणि त्यांना तिथे प्रार्थना करता येईल, असाही उद्देश या कारंज्याच्या निर्मितीमागे आहे.
advertisement
आणखी 9 वंदे भारत एक्सप्रेसना पंतप्रधान मोदी दाखवणार हिरवा झेंडा, कोणते असतील रूट?
विविध गोष्टींचं प्रतीक असेल हे कारंजं
दस्तऐवजांमध्ये असं म्हटलं आहे की, मल्टीमीडिया शो फाउंटनला शांतता आणि आत्मनिरीक्षणाचं अभयारण्य असलेल्या श्री राम मंदिराच्या पवित्र हद्दीत स्थान मिळालं आहे. या कारंज्याचा उद्देश केवळ राम मंदिर परिसराचं सौंदर्य वाढवणं हा नाही. त्या माध्यमातून मंदिरातील शांतता अधोरेखित केली जाणार आहे. कारंजं आणि मंदिराच्या वातावरणातील सुसंवाद एक सामंजस्यपूर्ण समन्वय निर्माण करेल. त्यामुळे भक्तांना आणि पर्यटकांना एक समग्र अनुभव मिळेल. त्यांच्या अस्तित्वाच्या आध्यात्मिक आणि संवेदी अशा दोन्ही आयामांना हा प्रकल्प स्पर्श करेल.
'असं' असेल डिझाईन
कारंज्याची वास्तूरचना भारताचं राष्ट्रीय फूल असलेल्या कमळाच्या सुंदर रूपासारखी असेल. कारंज्याच्या रचनेत कमळासारख्या प्रतिष्ठित नैसर्गिक घटकाचा समावेश केल्यानं भारताची ओळख आणि वारसा यांच्याशी एक मजबूत आणि हृदयस्पर्शी संबंध निर्माण होतो. कारंज्याच्या रचनेत हिंदू धर्मातील सात पवित्र नद्यांचं प्रतीक म्हणून कमळाच्या सात पाकळ्यांचा समावेश आहे. एकेक पाकळी गंगा, यमुना, सरस्वती, सिंधू, नर्मदा, गोदावरी आणि कावेरी या सात नद्याचं प्रतीक असेल. दस्तऐवजांमध्ये असं नमूद केलं आहे की, कारंज्यात मध्यवर्ती फुलाची निर्मिती करणाऱ्या सात पाकळ्या विष्णूचा सातवा अवतार असलेल्या रामाचं प्रतीक आहेत.
कारंज्याची सातही प्रवेशद्वारं हिंदू धर्मातील सात पवित्र नद्यांचं प्रतीक असतील आणि कारंज्याभोवती उपलब्ध अॅम्फी थिएटर पाहुण्यांना बसण्यासाठी सात विभागांमध्ये विभागलं जाईल. सर्व प्रवेशद्वारांमधील बसण्याची जागा भारताच्या दिव्य भूमीचे प्रतीक आहे, ज्यामधून पवित्र नद्या वाहतात अशी कल्पना केली गेली आहे. हे कारंजं कमळाच्या आकाराच्या पाकळ्यांच्या तीन थरांनी तयार होणार आहे. पाकळ्यांच्या प्रत्येक स्तरावर स्प्रे केल्यानं पाण्याचे महाकाय ढग तयार होतील आणि कारंज्याला एक विशाल स्वरूप देतील. पाकळ्यांच्या काठावर वाहणारं पाणी पायऱ्यांच्या आकाराचे धबधबे तयार करेल. याचा लोकांच्या मनावर आश्चर्यकारक परिणाम होईल.
प्रेक्षकांचा अनुभव
हे कारंजं पर्यटकांना वेगळा आणि अनोखा अनुभव देण्यासाठी डिझाईन केलं आहे. दिवसा ते एका धबधब्यासारखं दिसेल आणि तिथे येणाऱ्या लोकांच्या मनाला ताजेपणा आणि शांतता प्रदान करेल. सायंकाळनंतर या कारंज्याचं विशाल स्टेजमध्ये रूपांतर होईल. जिथे खास डिझाईन केलेले वॉटर शो प्रेक्षकांना रामायणाच्या काळात पोहोचवतील. दस्तऐवजात असं म्हटलं आहे की, मध्यवर्ती तलाव संपूर्ण कॉम्प्लेक्सचा केंद्रबिंदू आहे आणि त्याचा व्यास 100 मीटर आहे. पाणी, प्रकाश आणि ध्वनी एकत्र करून एक मल्टीमीडिया शो येथे चालवला जाईल.
या तलावाच्या सात प्रवेशद्वारांवर पाण्याचे बोगदे असतील. पाणी, प्रकाश आणि आर्किटेक्चरल डिझाईनचा परस्परसंवाद लोकांच्या अविस्मरणीय अनुभवासाठी स्टेज सेट करेल. विशेषत: रात्रीच्या वेळी पाण्याचे बोगदे मंत्रमुग्ध आकर्षण बनतील. मध्यवर्ती तलावाच्या सभोवती 25,000 आसनक्षमतेचं अॅम्फी थिएटर असेल.