आणखी 9 वंदे भारत एक्सप्रेसना पंतप्रधान मोदी दाखवणार हिरवा झेंडा, कोणते असतील रूट?

Last Updated:

आधीच 25 ट्रेन धावत आहेत, अशातच या 9 नवीन रुटचा आणखी समावेश झाल्याने देशभरात पसरलेल्या रुटची संख्या 34 होईल.

मोदी गव्हरमेंट स्किम
मोदी गव्हरमेंट स्किम
नवी दिल्ली, 21 सप्टेंबर : सध्या भारतातील 25 राज्यांमध्ये वंदे भारत एक्सप्रेस धावत आहेत. आता आणखी दोन राज्यांना आणखी एकेक वंदे भारत एक्सप्रेस मिळणार आहे. या दोन्ही राज्यांतील महत्त्वाच्या शहरांना या ट्रेन्स जोडतील. केरळ आणि ओडिशा या राज्यांना लवकरच त्यांची दुसरी वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन मिळणार आहे. या गाड्यांचे लोकार्पण 24 सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या दोन ट्रेनसह पंतप्रधान मोदी त्याचदिवशी वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनसाठी इतर 7 नवीन मार्गांचे उदघाटन करणार असल्याची माहिती आहे. या पैकी एक नवीन ट्रेन केशरी पांढऱ्या रंगात असणार आहे. आधीच 25 ट्रेन धावत आहेत, अशातच या 9 नवीन रुटचा आणखी समावेश झाल्याने देशभरात पसरलेल्या रुटची संख्या 34 होईल.
कासारगोड - त्रिवेंद्रम वंदे भारत एक्सप्रेस
केरळची दुसरी वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन सकाळी 7 वाजता कासरगोड येथून राज्याची राजधानी त्रिवेंद्रमसाठी निघेल, जिथे ती दुपारी 3.05 वाजता पोहोचेल. त्याच दिवशी ती तिथून 4.05 वाजता निघेल आणि रात्री 11.55 वाजता कासरगोडला पोहोचेल. ही, ट्रेन केशरी-पांढऱ्या रंगाच्या लिव्हरीमध्ये दिसेल.
पुरी-राउरकेला वंदे भारत एक्सप्रेस
पुरी स्टेशनवरून पहाटे 5 वाजता ट्रेन सुटेल आणि 6.05 वाजता भुवनेश्वरला पोहोचेल. त्यानंतर ती तिचे डेस्टिनेशन स्टेशन असलेल्या राउरकेला इथं दुपारी 12.45 वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासात, ट्रेन राउरकेलाहून 2.10 वाजता सुटेल आणि 7.5 तासात अंतर पूर्ण करून रात्री 9.40 वाजता पुरीला पोहोचेल.
advertisement
नवीन वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनचे रुट
या सर्व 9 मार्गांवर भारतीय रेल्वे 8 डब्यांच्या वंदे भारत एक्सप्रेस गाड्या चालवणार आहे. रिपोर्टनुसार, उदयपूर-जयपूर, रांची-हावडा, तिरुनेलवेली-चेन्नई, पाटणा-हावडा, हैदराबाद-बेंगळुरू, जामनगर-अहमदाबाद आणि विजयवाडा-चेन्नई हे नवीन रुट आहेत.
वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनचे सध्या असलेले रुट
सध्या 25 वंदे भारत एक्सप्रेस गाड्या भारतभर धावत आहेत, ज्यामध्ये प्रत्येकी 25 अप आणि डाउन मार्गे 50 मार्ग आहेत. या पैकी चार नॉर्दर्न झोनमध्ये, 3 सदर्न आणि सेंट्रल झोनमध्ये, 2 वेस्टर्न, वेस्टर्न सेंट्रल आणि नॉर्दर्न वेस्टर्न रेल्वे झोनमध्ये आणि प्रत्येकी 1 साउथ ईस्ट सेंट्रल, इस्टर्न, इस्ट कोस्ट, साउथ सेंट्रल, साउथ ईस्टर्न, नॉर्थ ईस्ट फ्रंटिअर, ईस्ट सेंट्रल, साउथ वेस्टर्न आणि नॉर्थ ईस्टर्न रेल्वेत ट्रेन धावत आहेत.
view comments
मराठी बातम्या/देश/
आणखी 9 वंदे भारत एक्सप्रेसना पंतप्रधान मोदी दाखवणार हिरवा झेंडा, कोणते असतील रूट?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement