दिवाळीच्या प्रवासाला लागले गालबोट
ही धक्कादायक घटना पंजाबमधील सरहिंदजवळ अमृतसर-सहरसा गरीब रथ एक्सप्रेसमध्ये . ट्रेनच्या मागील डब्यांमध्ये अचानक आग लागली आणि काही मिनिटांतच ही आग वाऱ्याच्या वेगाने पसरू लागली. आगीच्या भयंकर ज्वाळा आणि धुराचे लोट पाहून प्रवाशांची मोठी धावपळ उडाली. एक्सप्रेसमध्ये आग लागल्याचे समजताच प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. दिवाळीसाठी घरी पोहोचण्याची स्वप्ने पाहणाऱ्या या प्रवाशांना आता जीव वाचवण्यासाठी धडपड करावी लागली. भीतीने घाबरलेल्या अनेक प्रवाशांनी तात्काळ ट्रेनमधून खाली उड्या मारल्या आणि आपले प्राण वाचवले.
advertisement
प्राथमिक माहितीनुसार, या आगीत एक्सप्रेसचे तीन डबे जळून खाक झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच रेल्वे प्रशासन आणि अग्निशमन दलाची टीम तातडीने घटनास्थळी दाखल झाली. अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवले. ही आग किती भयंकर होती, याचे व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले आहेत.
दिवाळीच्या काळात लाखो लोक आपल्या कुटुंबांना भेटायला जात असताना रेल्वेने प्रवास करतात. अशा वेळी ही दुर्घटना घडल्याने प्रशासनासमोर रेल्वे सुरक्षा आणि देखभालीचा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. दुसरं महत्त्वाचं म्हणजे ही आग AC कोचला लागल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. शॉर्ट सर्किटनं लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. यामध्ये किती जखमी आहेत याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही.