TRENDING:

वधूची आई अन् मुलाचा बाप प्रेमात पडले, मुलांच्या लग्नाआधी 'लव्ह बर्ड' उडून गेले, मंडपात फॅमिली ड्रामा!

Last Updated:

प्रेम कधी आणि कुठे होईल हे काही सांगता येत नाही. दोन कुटुंबांमध्ये लग्नाची चर्चा सुरू होती, पण लग्नाआधीच वराची आई आणि वधूच्या वडिलांमध्ये अफेयर सुरू झालं.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
प्रेम कधी आणि कुठे होईल हे काही सांगता येत नाही. दोन कुटुंबांमध्ये लग्नाची चर्चा सुरू होती, पण लग्नाआधीच वराची आई आणि वधूच्या वडिलांमध्ये अफेयर सुरू झालं. एवढच नाही वधू वराच्या लग्नाआधीच ते दोघं पळून गेले. पोलिसांनी जेव्हा दोघांना पकडलं, तेव्हा त्यांनी एकत्र राहण्याचा आग्रह धरला. मागच्या 8 दिवसांपासून 45 वर्षांची महिला तिच्या घरातून बेपत्ता होती. यानंतर कुटंबाने सुरूवातीला नातेवाईकांमध्ये शोध घेतला, पण कोणतीही माहिती न मिळाल्यामुळे त्यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांना गुरूवारी ही महिला सापडली, पण त्यानंतर मिळालेली माहिती धक्कादायक होती.
वधूची आई अन् मुलाचा बाप प्रेमात पडले, मुलांच्या लग्नाआधी 'लव्ह बर्ड' उडून गेले, मंडपात फॅमिली ड्रामा! (AI Image)
वधूची आई अन् मुलाचा बाप प्रेमात पडले, मुलांच्या लग्नाआधी 'लव्ह बर्ड' उडून गेले, मंडपात फॅमिली ड्रामा! (AI Image)
advertisement

महिलेने तपासात खुलासा केला की तिच्या मुलाचं लग्न ज्या शेतकऱ्याच्या मुलीसोबत ठरलं आहे, तिच्या वडिलांसोबत मी पळून गेले होते. कुटुंब लग्नाची तयारी करत असताना, वराची आई आणि वधूच्या वडिलांचे प्रेमसंबंध सुरू झाले. यानंतर त्यांनी मुलांच्या लग्नाआधीच पळून जाण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून दोघंही आठ दिवस बेपत्ता होते.

महिलेचा परतण्यास नकार

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
पुणेकरांनो सावधान! कॉल फॉरवर्डिंगमधून बँक खात होऊ शकतं रिकामं; अशी घ्या काळजी
सर्व पहा

महत्त्वाचे म्हणजे, महिलेने आता घरी परतण्यास नकार दिला आहे. ती तिच्या प्रियकरासोबत त्याच्या गावी गेली आहे. हे प्रकरण उज्जैन जिल्ह्यात चर्चेचा विषय बनले आहे. बारनगर पोलिसांनी सांगितले की पुरुष आणि महिला दोघेही प्रौढ आहेत आणि हे प्रकरण पूर्णपणे वैयक्तिक आहे, त्यामुळे कोणतीही कायदेशीर कारवाई करता येत नाही.

advertisement

मराठी बातम्या/देश/
वधूची आई अन् मुलाचा बाप प्रेमात पडले, मुलांच्या लग्नाआधी 'लव्ह बर्ड' उडून गेले, मंडपात फॅमिली ड्रामा!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल