हैदराबाद: हैदराबादमध्ये घरगुती वादातून हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. 27 वर्षीय महिलेने आपल्या 10 महिन्यांच्या चिमुकल्या मुलाला विष देऊन ठार केल्याचा आरोप असून, त्यानंतर तिनेही आत्महत्या केल्याचे पोलिसांचे प्राथमिक म्हणणे आहे. या धक्कादायक घटनेनंतर मुलाच्या आजीनेही आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती आहे.
advertisement
मृत महिलेचे नाव सुषमा (वय 27) असे असून, तिचा विवाह चार वर्षांपूर्वी चार्टर्ड अकाउंटंट यशवंत रेड्डी यांच्याशी झाला होता. या दाम्पत्याला यशवर्धन रेड्डी नावाचा 10 महिन्यांचा मुलगा होता. कुटुंबीयांच्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून पती-पत्नीमध्ये वारंवार वाद होत होते.
पोलीस तपासानुसार सुषमा काही कौटुंबिक कार्यक्रमाच्या खरेदीसाठी आई ललिता (वय 44) यांच्या घरी आली होती. त्याच घरात सुषमाने बाळाला सोबत घेऊन एका खोलीत गेली. तेथे तिने प्रथम मुलाला विष दिले आणि त्यानंतर स्वतःही आत्महत्या केल्याचा संशय आहे.
सायंकाळी साडेनऊच्या सुमारास यशवंत रेड्डी कामावरून घरी परतले. बेडरूम आतून बंद असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी दरवाजा तोडला. आत सुषमा आणि मुलगा बेशुद्ध अवस्थेत आढळून आले. रुग्णालयात नेल्यानंतर दोघांनाही मृत घोषित करण्यात आले. त्यानंतर यशवंत यांनी पोलिसांना माहिती दिली.
मुलगी आणि नातू मृतावस्थेत दिसताच ललिता यांना जबर धक्का बसला. त्यानंतर त्यांनीही आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे पोलिसांनी सांगितले. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे. प्राथमिक चौकशीत पती-पत्नीतील घरगुती वाद हे कारण असल्याचे संकेत मिळत आहेत. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून, कुटुंबीयांसह संबंधितांचे जबाब नोंदवले जात आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.
मदत हवी असल्यास
मानसिक तणाव किंवा आत्महत्येचे विचार असल्यास त्वरित मदत घ्या.
Vandrevala Foundation for Mental Health: 9999 666 555
help@vandrevalafoundation.com
TISS iCall: 022-25521111 (सोमवार ते शनिवार, सकाळी ८ ते रात्री १०)
(आपण किंवा आपल्या ओळखीतील कोणाला मदतीची गरज असल्यास, जवळच्या मानसिक आरोग्य तज्ज्ञांशी संपर्क साधा.)
