आयएमडीने दिलेल्या इशाऱ्यानुसार, १८ डिसेंबरला तामिळनाडुतील कन्याकुमारी, तिरुनेलवेली, थूथुकुडी, रामनाथपुरम, पुदुकोट्टई आणि तंजावुर जिल्ह्यात मुसधळार पावसाची शक्यता आहे. तर १९ डिसेंबरला काही ठिकाणी मुसळधार पाऊस होईल. १९ डिसेंबरला तामिळनाडु, पुदुचेरी आणि कराईकलमध्ये काही भागात वादळी वारे आणि वीजांच्या कडकडाटाची शक्यता आहे.
Weather Update : मुंबईत आजपासून दोन दिवस ढगाळ वातावरण; 'या' ठिकाणी पावसाची शक्यता
advertisement
थूथुकुडी जिल्ह्यात काही भागांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. कूसलीपट्टी आणि इनाम मनियाची भागात पावसामुळे पाणी नदीपात्रातून बाहेर पडले. पाणी रोखण्यासाठी वाळूने भरलेली पोती आणि जेसीबी मशिनचा वापर केला गेला. अवकाळी सुरु असलेल्या या मुसळधार पावसामुळे तामिळनाडुत जनजीवन विस्कळीत झाले आहे.
नागरिकांच्या सुरक्षेसाठी खबरदारीची पावले उचलली जात आहेत. तामिळनाडुचे मंत्री केकेएसएसआर रामचंद्रन यांनी सांगितलं की, जिल्ह्यांसाठी मंत्री आणि दोन आयएएस अधिकाऱ्यांची अतिरिक्त नियुक्ती करण्यात आली आहे. पावसामुळे बाधित भागांमध्ये आवश्यक ती खबरदारी आणि उपाययोजनांवर ते लक्ष ठेवून आहेत.