राजनगर एक्सटेंशनमधील ओरा कॅमोरा सोसायटीमध्ये हे प्रकरण. एका खाजगी कंपनीत काम करणारा उमेश शर्मा आणि त्याची पत्नी दीपशिखा. यांचे ओरा कॅमोरा यांचे दोन फ्लॅट आहेत. ते स्वत: टॉवर एममध्ये राहतात. तर एफ टॉवरमधील पाचव्या मजल्यावरील फ्लॅट त्यांनी एका जय आणि आकृती गुप्ता या कपलला भाड्याने दिला.
दीपशिखा गुप्ता यांच्याकडे भाडं मागायला गेली. पण नंतर ती सापडलीच नाही. नंतर तपास केला असता एका सुटकेसमध्ये तिच्या शरीराचे तुकडे सापडले. गुप्ता कपलने दीपशिखाची हत्या केली होती. आधी ओढणीने गळा दाबून तिचा खून केला नंतर तिची तुकडे करून सूटकेसमध्ये भरले.
advertisement
शर्मा कपलकडे काम करणाऱ्या मिनीने सांगितलं, जेव्हा ती भाडेकरूच्या अपार्टमेंटमध्ये पोहोचली तेव्हा तिला जमिनीवर रक्ताचे डाग दिसले. संशयास्पद वाटल्याने तिने सुटकेस उघडली आणि आत दीपशिखाचा मृतदेह पाहून तिला धक्का बसला.
पोलिसांना तात्काळ घटनेची माहिती दिली. या जोडप्याला अटक करण्यात आली. आरोपी जोडप्याने पोलिसांना सांगितलं की, भाड्यावरून त्यांचा घरमालकाशी वाद झाला होता. रागाच्या भरात त्यांनी तिचा स्कार्फने गळा दाबला आणि प्रेशर कुकरने डोक्यावर वार केला.
Wedding News : लग्नाआधी आवडला नवरा, लग्नादिवशी म्हणे, त्याचं वजन वाढलं; नवरीने उचललं मोठं पाऊल
उमेश शर्माने सांगितलं की, त्यांचा फ्लॅट अजय गुप्ताला सुमारे एक वर्षासाठी 18000 रुपये महिना भाड्याने दिला. भाडेकरूने पाच महिन्यांपासून भाडं दिलं नव्हतं. त्यांनी त्यांच्या पत्नीला भाडे वसूल करण्यास सांगितले, पण तिने बराच वेळ फोन उचलला नाही.
