हार्ट अटॅक आलेल्या नवऱ्याला बाईकवरून हॉस्पिटल फिरवत राहिली बायको; उपचार मिळाले नाही, मदतही नाही, अपघातात मृत्यू

Last Updated:

Husband Wife Accident after Heart Attack : हार्ट अटॅक आलेल्या पतीला पत्नी बाईकवरून हॉस्पिटलला घेऊन गेली, 2 रुग्णालयांनी उपचार नाकारले, रस्त्यात अपघात झाला, मदतीसाठी ती गयावया करत होती, पण कुणीच थांबलं नाही.

News18
News18
सत्यवान सावित्रीची कथा सगळ्यांनाच माहिती आहे. आपला पती सत्यवानाचे प्राण वाचवण्यासाठी सावित्री यमाच्या मागे मागे गेली होती. अशीच कलियुगातील सावित्री जी आपल्या सत्यवानाला वाचवण्यासाठी धडपडत होती. महिला आपल्या नवऱ्याला वाचवण्यासाठी मदत मागत राहिली पण आरोग्य व्यवस्थेची अनास्था, हरवलेली माणुसकी आणि त्यात नियतीचा खेळ यात तिने आपल्या नवऱ्याला गमावलं आहे.
बंगळुरूतील ही काळीज पिळवटून टाकणारी घटना. बालाजीनगरमध्ये राहणारा 34 वर्षांचा वेंकटरमणन, एक गॅरेज मॅकेनिक. त्याच्या छातीत वेदना होऊ लागल्या. लगेच कुणाची मदत मिळाली नाही तर त्याच्या पत्नीनेच त्याला बाईकवर घेतलं आणि रुग्णालयाकडे धाव घेतली. सुरुवातीला ती एका रुग्णालयात गेली, तिथं डॉक्टरच नव्हते. ड्युटीवर डॉक्टर नसल्याने त्याना उपचार नाकारण्यात आले. ती तशीच बाईकवरून दुसऱ्या रुग्णालयात गेली. तिथं त्यांना घेतलं, त्यांचे रिपोर्ट्स काढण्यात आले. ईसीजीमध्ये त्यांना सौम्य हार्ट अटॅक आल्याचं निदान झालं. पण इथं त्यांच्यावर कोणतेही आपात्कालीन उपचार करण्यात आले नाही. तसंच त्यांना अॅम्ब्लुन्सही देण्यात आली नाही.
advertisement
पण एक सावित्री थांबली नाही तिने आपल्या पतीला वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले. तिने पुन्हा नवऱ्याला बाईकवर घेतलं आणि तिसऱ्या हॉस्पिटलकडे धाव घेतली. पण नियतीने आपला खेळ केला. बाईकचा अपघात झाला. आधीच हार्ट अटॅक आलेला नवरा अपघात झाला आणि रस्त्यात रक्ताच्या थारोळ्यात पडला.
advertisement
पत्नी येणाऱ्याजाणाऱ्या गाड्यांकडून मदत मागत होती. हात जोडून 'गाडी थांबवा, माझ्या पतीला वाचवा', असं ओरडत होती. कुणी मदत करणं सोडा, गाडी थांबवून काय झालं हे पाहण्याची तसदीही घेतली नाही. हात जोडून मदत मागतानाचा महिलेचा हा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. पण कुणीच थांबलं नाही. बऱ्याच वेळाने एक कॅब ड्रायव्हर देवासारखा आला. त्याने गाडी थांबवली, त्याने दोघांनीही गाडीत घेतलं आणि गाडी हॉस्पिटलच्या दिशेने नेली.
advertisement
advertisement
आता आपल्या पतीचा जीव वाचेल, अशी आशा महिलेच्या मनात होती. पण... वेंकटरमणन यांचा जीव तोपर्यंत गेला होता. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.
5 वर्षांचा मुलगा आणि दीड महिन्यांची मुलगी... दोन मुलांना पोरकं करून ते निघून गेले. एक आई जिने आधीच आपली 5 मुलं गमावली होती. सहावा मुलगा वेंकटरमणनलाही तिने गमावलं. पण या परिस्थितीतही या कुटुंबाने सामाजिक भान जपलं. जिथं या कुटुंबाच्या मदतीला वेळेत कुणीच धावून आलं नाही तिथं या कुटुंबाने मात्र वेंकटरमणन यांचे डोळे दान केले. जाता जाता ते आपली दृष्टी देऊन गेले.
view comments
मराठी बातम्या/देश/
हार्ट अटॅक आलेल्या नवऱ्याला बाईकवरून हॉस्पिटल फिरवत राहिली बायको; उपचार मिळाले नाही, मदतही नाही, अपघातात मृत्यू
Next Article
advertisement
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांना कोर्टाचा दणका, कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता
माणिकराव कोकाटे यांना कोर्टाचा दणका, कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता
  • माणिकराव कोकाटे यांना कोर्टाचा दणका, कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता

  • माणिकराव कोकाटे यांना कोर्टाचा दणका, कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता

  • माणिकराव कोकाटे यांना कोर्टाचा दणका, कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता

View All
advertisement