अजब प्रकरण! बाथरूमला गेला इंजिनीअर, बॉसने कर्मचाऱ्याला नोकरीवरूनच काढून टाकलं
- Published by:Priya Lad
Last Updated:
Boss Fired Employee For Long Bathroom Breaks : काम सुरू असताना सतत बाथरूमला जाणं एका इंजिनीअरला महागात पडलं. कंपनीने त्याला नोकरीवरून काढलं. त्यानंतर हे प्रकरण कोर्टात पोहोचलं. न्यायालयाने असा निर्णय दिला की...
लघवी किंवा शौचाला होणं ही शरीराची नैसर्गिक क्रिया. ज्याला कुणी रोखू शकत नाही. त्यामुळे रेल्वे स्टेशन, बस स्टॉप, हॉटेल्स, ऑफिसेस अशा सार्वजनिक ठिकाणीही बाथरूम असतात. कर्मचारी ऑफिसमध्ये बाथरूममध्ये ब्रेक घेतात. यावर कोणतीही बंधनं नाहीत. असं असताना एका कंपनीत मात्र एका कर्मचाऱ्याला तोसुद्धा इंजिनीअर, त्याला त्याच्या बॉसने बाथरूमला गेला म्हणून नोकरीवरून कायमचं काढून टारलं आहे.
advertisement
चीनमधील ही घटना सोशल मीडियावर चर्चेत आहे. ली नावाचा हा इंजिनीअर 2010 पासून जियांग्सू प्रांतातील एका कंपनीत काम करतो. 2014 साली लीचं ओपन टर्म काँट्रॅक्ट रिन्यू करण्यात आलं. एप्रिल ते मे 2024 दरम्यान त्याने एका महिन्यात 14 वेळा बाथरूम ब्रेक घेतले. त्यापैकी एक ब्रेक जवळजवळ चार तासांचा होता. सतत बाथरूमला जात असल्याने कंपनीने त्याला नोकरीवरून काढून टाकलं. त्यानंतर हे प्रकरण कोर्टात पोहोचलं.
advertisement
advertisement
advertisement
आपल्या बचावात लीने मे आणि जून 2024 मध्ये ऑनलाइन खरेदी केलेल्या मूळव्याधीच्या औषधांच्या पावत्या आणि जानेवारी 2025 मध्ये झालेल्या शस्त्रक्रियेतील रुग्णालयातील नोंदी सादर केल्या. आजारपणामुळे त्याला दीर्घकाळ विश्रांती घ्यावी लागली आणि त्यांची बडतर्फी बेकायदेशीर असल्याचा दावा त्याने केला. तसंच 320000 युआन म्हणजे 40,75,000 रुपये भरपाई मागणी केली.
advertisement
न्यायालयाने असा निर्णय दिला की लीने घेतलेला वेळ शारीरिकदृष्ट्या आवश्यक असलेल्या वेळेपेक्षा जास्त होता. वैद्यकीय नोंदींमध्ये अनेक उल्लंघनांचा समावेश असल्याचंदेखील नमूद केले. लीने कंपनीला त्याच्या आजाराची माहिती दिली नाही किंवा आजारी रजेसाठी अर्ज केला नाही, ज्यामुळे कराराच्या अटींचे उल्लंघन झाले. दोन सुनावणींनंतर कोर्टाने मध्यस्थी केली. लीची कंपनीतील सेवा आणि बेरोजगारीचा त्रास लक्षात घेऊन कंपनीला 30000 युआन म्हणजे 3,80,000 रुपये भरपाई देण्यास सांगितलं.
advertisement








