अंघोळीला गेली 15 वर्षांची मुलगी बाहेर आलीच नाही; कुटुंबाने दरवाजा उघडून पाहिला आणि पायाखालची जमीनच सरकली

Last Updated:
Girl Died In Bathroom Due to Gas Geyser : अंघोळीला बाथरूममध्ये गेलेल्या 15 वर्षीय मुलीसोबत धक्कादायक घडलं आहे. तिचा मृत्यूच झाला आहे. तिच्यासोबत जे घडलं ते तुमच्यासोबतही घडू शकतं.
1/7
सकाळी उठल्या उठल्या आपण सगळे सगळ्यात आधी काय करतो तर ब्रश, टॉयलेट आणि अंघोळ. म्हणजे उठल्यावर सगळ्यात आधी आपण बाथरूममध्ये जातो. अशीच एक 15 वर्षांची मुलगी जी अंघोळीसाठी बाथरूममध्ये गेली. तिने बाथरूममचा दरवाजा बंद केला आणि तिला मृत्यूने गाठलं आहे. उत्तर प्रदेशच्या बुलंदरमधील देवीपुरा येथील ही धक्कादायक घटना आहे.

advertisement
2/7
15 वर्षांची ही मुलगी अंघोळीला बाथरूममध्य़े गेली. तिने बाथरूम बंद केला. पण बराच वेळ झाला ती बाहेर आलीच नाही. कुटुंबाने दरवाजा ठोठावला पण काहीच प्रतिसाद नाही. शेवटी बाथरूमचा दरवाजा तोडला आणि जे दिसलं ते पाहून कुंटुंबच काय सगळे हादरले.

3/7
ती मुलगी बाथरूममध्ये बेशुद्ध अवस्थेत पडली होती. कुटुंबाने तिला लगेच रुग्णालयात नेलं. पण तपासणीनंतर डॉक्टरांनी किशोरीला मृत घोषित केलं. आता या मुलीसोबत बाथरूममध्ये असं काय घडलं?

4/7
बाथरूममध्ये अंघोळ करताना गॅस गीझर चालू होता आणि बाथरूमचा दरवाजा बंद. बाथरूम पूर्णपणे बंद होतं हवा जाण्यासाठी जागाच नव्हती. गीझरचा गॅस बाथरूममध्येच कोंडला ज्यात गुदमरून मुलीचा मृत्यू झाला.

5/7
डॉक्टरांच्या मते, बंद बाथरूममध्ये असलेल्या गॅस गिझरमधून निघणाऱ्या विषारी वायूमुळे ऑक्सिजनची कमतरता निर्माण झाली होती. यामुळेच तिचा गुदमरून मृत्यू झाला. पोलीस तपासातही हेच कारण समोर आलं आहे.

6/7
तज्ज्ञांच्या मते, असे अपघात सहसा कार्बन मोनोऑक्साइडमुळे होतात. हा वायू रंगहीन आणि गंधहीन असतो, ज्यामुळे तो लोकांना दिसत नाही. हवेशीर आणि बंद जागेत हा वायू वेगाने पसरतो आणि काही मिनिटांतच प्राणघातक ठरू शकतो.

7/7
त्यामुळे गॅस गीझर वापरताना काही खबरदारी घेणं खूप महत्त्वाचं आहे. पूर्णपणे बंद बाथरूममध्ये कधीही गॅस गीझर बसवू नका, बाथरूममध्ये खिडकी किंवा एक्झॉस्ट फॅन असावा. आंघोळीपूर्वी पाणी गरम करा आणि नंतर गीझर बंद करा. बाथरूमच्या बाहेर हवेशीर जागेत गीझर बसवणं अधिक सुरक्षित आहे.

Tejasvee Ghosalkar Join BJP: तेजस्वी घोसाळकरांचा अखेर भाजपात प्रवेश, चारच ओळी बोलल्या, 'शिवसेनेने मला...'
तेजस्वी घोसाळकरांचा अखेर भाजपात प्रवेश, चारच ओळी बोलल्या, 'शिवसेनेने मला...'
  • तेजस्वी घोसाळकरांचा अखेर भाजपात प्रवेश, चारच ओळी बोलल्या, 'शिवसेनेने मला...'

View All
advertisement