उत्तर प्रदेशच्या झाशी जिल्ह्यातील गरौठा पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या इंद्रनगर येथे ही घटना घडली आहे. 76 वर्षीय रामरतन गुप्ता हे परिसरातील प्रसिद्ध व्यापारी होते. रामरतन हे त्यांची 70 वर्षांची पत्नी रामदेवी गुप्ता यांच्यासोबत राहत होते. दोघांनाही अरविंद गुप्ता, धर्मेंद्र गुप्ता आणि उपेंद्र गुप्ता अशी तीन मुलं आहेत. मूळचे हमीरपूर जिल्ह्यातील परसन गावचे रामरतन गुप्ता लग्नानंतर गरौठाला गेले. रामरतन आणि रामदेवी यांनी त्यांच्या वैवाहिक आयुष्याची 50 वर्ष आनंदाने घालवली. एवढंच नाही तर आयुष्यानंतरचा प्रवासही दोघांनी एकत्र सुरू केला.
advertisement
रामदेवी यांचं शनिवार 4 ऑक्टोबरला सकाळी आजारपणामुळे निधन झाले. रामदेवी यांच्या निधनानंतर नातेवाईक आणि कुटुंबातील सदस्य घरी आले, पण रामरतन यांनी पत्नीचे पार्थिव पाहायाला नकार दिला. रामदेवी यांच्यावर अंत्यसंस्कार होण्याआधीच त्यांचे पती रामरतन यांचेही निधन झाली. रामरतन यांच्या अचानक मृत्यूनंतर दोघांचीही अंत्ययात्रा एकत्र काढण्यात आली. रामरतन आणि रामदेवी यांना अंत्यसंस्कारासाठी स्मशानामध्ये नेण्यात आलं तेव्हा संपूर्ण गावात शोककळा पसरली.
गरौठा शहरातील रहिवासी असलेले मृत रामरतन गुप्ता हे भगवान शिवाचे भक्त होते. त्यांच्या पत्नी रामदेवी यांचं शनिवारी सकाळी 9 वाजता निधन झाले, तर त्यांचे पती रामरतन यांनी रात्री 9 वाजता प्राण सोडले. 12 तासांमध्येच दोघांचाही मृत्यू झाल्यामुळे त्यांचे अंत्यसंस्कारही एकत्र करण्यात आले.