बंगळुरूतील ही काळीज पिळवटून टाकणारी घटना. बालाजीनगरमध्ये राहणारा 34 वर्षांचा वेंकटरमणन, एक गॅरेज मॅकेनिक. त्याच्या छातीत वेदना होऊ लागल्या. लगेच कुणाची मदत मिळाली नाही तर त्याच्या पत्नीनेच त्याला बाईकवर घेतलं आणि रुग्णालयाकडे धाव घेतली. सुरुवातीला ती एका रुग्णालयात गेली, तिथं डॉक्टरच नव्हते. ड्युटीवर डॉक्टर नसल्याने त्याना उपचार नाकारण्यात आले. ती तशीच बाईकवरून दुसऱ्या रुग्णालयात गेली. तिथं त्यांना घेतलं, त्यांचे रिपोर्ट्स काढण्यात आले. ईसीजीमध्ये त्यांना सौम्य हार्ट अटॅक आल्याचं निदान झालं. पण इथं त्यांच्यावर कोणतेही आपात्कालीन उपचार करण्यात आले नाही. तसंच त्यांना अॅम्ब्लुन्सही देण्यात आली नाही.
advertisement
पण एक सावित्री थांबली नाही तिने आपल्या पतीला वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू ठेवले. तिने पुन्हा नवऱ्याला बाईकवर घेतलं आणि तिसऱ्या हॉस्पिटलकडे धाव घेतली. पण नियतीने आपला खेळ केला. बाईकचा अपघात झाला. आधीच हार्ट अटॅक आलेला नवरा अपघात झाला आणि रस्त्यात रक्ताच्या थारोळ्यात पडला.
पत्नी येणाऱ्याजाणाऱ्या गाड्यांकडून मदत मागत होती. हात जोडून 'गाडी थांबवा, माझ्या पतीला वाचवा', असं ओरडत होती. कुणी मदत करणं सोडा, गाडी थांबवून काय झालं हे पाहण्याची तसदीही घेतली नाही. हात जोडून मदत मागतानाचा महिलेचा हा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. पण कुणीच थांबलं नाही. बऱ्याच वेळाने एक कॅब ड्रायव्हर देवासारखा आला. त्याने गाडी थांबवली, त्याने दोघांनीही गाडीत घेतलं आणि गाडी हॉस्पिटलच्या दिशेने नेली.
आता आपल्या पतीचा जीव वाचेल, अशी आशा महिलेच्या मनात होती. पण... वेंकटरमणन यांचा जीव तोपर्यंत गेला होता. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.
अजब प्रकरण! बाथरूमला गेला इंजिनीअर, बॉसने कर्मचाऱ्याला नोकरीवरूनच काढून टाकलं
5 वर्षांचा मुलगा आणि दीड महिन्यांची मुलगी... दोन मुलांना पोरकं करून ते निघून गेले. एक आई जिने आधीच आपली 5 मुलं गमावली होती. सहावा मुलगा वेंकटरमणनलाही तिने गमावलं. पण या परिस्थितीतही या कुटुंबाने सामाजिक भान जपलं. जिथं या कुटुंबाच्या मदतीला वेळेत कुणीच धावून आलं नाही तिथं या कुटुंबाने मात्र वेंकटरमणन यांचे डोळे दान केले. जाता जाता ते आपली दृष्टी देऊन गेले.
