स्पेशल सर्व्हिस ग्रुप (एसएसजी) मध्ये मेजर पदावर तैनात असलेले मोईज अब्बास शाह हे पाकिस्तानच्या चकवाल जिल्ह्यातील रहिवासी होते आणि त्यांचे वय 37 वर्ष होते. 2007 मध्ये इस्लामाबादच्या लाल मशीद कारवाईच्या पार्श्वभूमीवर स्थापन झालेल्या टीटीपीने आता पाकिस्तानसाठीच मोठा धोका निर्माण केला आहे. काही काळ पाकिस्तानच्या गुप्तचर संस्था आयएसआयच्या मदतीने वाढलेले हे गट आता पाकिस्तानवरच उलटले आहेत.
advertisement
पाकिस्तानवर टीटीपीचे प्राणघातक हल्ले....
टीटीपीने 2024 मध्ये आतापर्यंत 116 पेक्षा अधिक पाकिस्तानी सैनिक ठार केल्याची माहिती आहे, तर गेल्या वर्षीच्या तुलनेत हा आकडा 1200 पेक्षा अधिक होता. यामुळे पाक लष्कर आणि सुरक्षा यंत्रणांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
दरम्यान, मेजर मोईज अब्बास शाह याने 2019 मध्ये विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना अटक केल्याचा दावा केला होता. अभिनंदन यांनी मिग-21 विमानात बसून पाकिस्तानच्या F-16 विमानाचा सामना केला होता. त्यानंतर त्यांचे विमान पाडले गेले आणि ते पाकिस्तानच्या ताब्यात गेले. आज त्या घटनेत सहभागी असल्याचा दावा करणारा पाक अधिकाऱ्याचा अंत स्वतः पाकमधील दहशतवाद्यांच्या गोळीने झाला आहे.
TTP ची स्थापना कधी झाली?
2007 मध्ये पाकिस्तानी सैन्याने लाल मशिदीवर कारवाई केली, ज्याच्या निषेधार्थ तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) नावाची दहशतवादी संघटना स्थापन करण्यात आली. या दहशतवादी संघटनेचा संस्थापक सदस्य कारी हुसेन मेहसूद, ज्याने प्रथम टीटीपीच्या दहशतवाद्यांना आत्मघाती बॉम्बर बनण्याचे प्रशिक्षण दिले होते, तो 2007 मध्ये जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा कमांडर होता आणि तो पाकव्याप्त काश्मीरमध्ये जैशच्या दहशतवाद्यांना आत्मघाती हल्ल्यांसाठी प्रशिक्षण देत असे.