जागा वाटपाचा फॉर्म्युला हा गेल्या निवडणुकीत पक्षाच्या कामगिरीच्या आधारावर असेल. तसंच राज्यांमध्ये पक्षाची ताकद किती यानुसार जागा वाटप ठरेल अशी माहिती एका नेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिलीय. याआधी इंडिया आघाडीकडून सांगण्यात आलं होतं की, वेगवेगळ्या राज्यात जागा वाटपाची व्यवस्था लगेच सुरू केली जाईल. लवकरच एकमेकांच्या सहकार्याने ती पूर्ण होईल.
advertisement
Nagpur : मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मागणीला विरोध, कुणबी-ओबीसींचं आंदोलन
मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल, नीतीश कुमार यांच्यासोबत राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालू प्रसाद यादव यांनी मुंबईतील बैठकीवेळी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागावाटपाच्या चर्चेसाठी दबाव टाकला होता असं सांगितलं जातंय. एप्रिल-मे महिन्यात लोकसभा निवडणूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे निवडणुकीच्या दृष्टीने तयारीसाठी वेळ मिळावा आणि रणनिती आखता यावी यासाठी हालचाली सुरू केल्या असल्याचं सांगण्यात येतंय.