Nagpur : मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मागणीला विरोध, कुणबी-ओबीसींचं आंदोलन
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
नागपूरमध्ये ओबीसी नेत्यांनी साखळी उपोषण केलं आहे. १७ सप्टेंबरला ओबीसींचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाही काढण्यात येणार आहे.
नागपूर, 13 सप्टेंबर : मराठा आरक्षणासाठी गेल्या १५ दिवसांपासून जालन्यातील अंतरवाली सराटी इथं मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसले आहेत. मराठा आरक्षण मिळाल्याशिवाय उपोषण थांबवणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतलीय. दरम्यान, मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या विरोधात नागपूरमध्ये ओबीसी समाजाकडून आंदोलन केलं जात आहे. या आंदोलनाला तेली, माळी आणि पोवार समाजाने पाठिंबा दिला आहे.
नागपूरमध्ये ओबीसी नेत्यांनी साखळी उपोषण केलं आहे. १७ सप्टेंबरला ओबीसींचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाही काढण्यात येणार आहे. ओबीसी समाजाकडून त्यांच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही असं लेखी आश्वासन द्या अशी मागणी यावेळी करण्यात आली. मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देणार नाही, याचं लेखी आश्वासन मिळेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असा इशाराही ओबीसी नेत्यांनी दिलाय.
advertisement
मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं अशीही मराठा आंदोलकांची भूमिका आहे. मात्र हे प्रमाणपत्र देण्याच्या मागणी विरोधात कुणबी-ओबीसींनी आंदोलन सुरू केलं आहे. ‘जातीनुसार जनगणना करावी, ५२ टक्के ओबीसी समाजाला ५२ टक्के आरक्षण द्यावं. केंद्र सरकारने ५० टक्के आरक्षणाची मर्यादा वाढवावी अशी मागणी ओबीसी आंदोलकांनी केलीय.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 13, 2023 7:41 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नागपूर/
Nagpur : मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मागणीला विरोध, कुणबी-ओबीसींचं आंदोलन