TRENDING:

BSF : आर्मी, एअर फोर्सनंतर बीएसएफने दाखवला दम, जैशच्या 7 दहशतवाद्यांचा खात्मा, पुरावाही दिला

Last Updated:

Ind V Pak : भारतीय लष्कर आणि हवाई दलानंतर आता सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) आपला दम दाखवला आहे. बीएएसएफने जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांचा खात्मा केला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
India Pakistan Tension : दहशतवाद्यांवर भारताने एअर स्ट्राइक केल्यानंतर पाकिस्तान चांगलाच बिथरला आहे. पाकिस्तानी सैन्याने भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मागील काही दिवसांपासून पाकिस्तानकडून आगळीक करत प्रत्यक्ष नियंत्रण रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर तणावाची स्थिती आहे. भारतीय लष्कर आणि हवाई दलानंतर आता सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) आपला दम दाखवला आहे. बीएएसएफने जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांचा खात्मा केला.
आर्मी, एअर फोर्सनंतर बीएसएफने दाखवला दम,  जैशच्या 7 दहशतवाद्यांचा खात्मा
आर्मी, एअर फोर्सनंतर बीएसएफने दाखवला दम, जैशच्या 7 दहशतवाद्यांचा खात्मा
advertisement

भारताकडून दहशतवाद्यांचे तळ उद्धवस्त करण्यासाठी ऑपरेशन सिंदूर सुरू करण्यात आले. हे ऑपरेशन अद्याप संपले नाही. भारताच्या एअर स्ट्राइकनंतर बिथरलेल्या पाकिस्नाकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करत जोरदार गोळीबार केला. पाकिस्तानकडून डागण्यात आलेले ड्रोन हल्ले प्रभावीपणे परतवून लावण्यात आले आणि सीएफव्हींना योग्य उत्तर देण्यात आल्याची माहिती इंडियन आर्मीने सोशल मीडियावर दिली.

बीएसएफकडून खात्मा...

काश्मीरमध्ये पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधी केली जात आहे. या गोळीबाराच्या आडून पाकिस्तान दहशतवाद्यांना भारताच्या हद्दीत पाठवत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला.

advertisement

advertisement

जम्मू-काश्मीरमधील सांभा येथे बीएसएफने पाकिस्तानच्या गोळीबाराला उत्तर देताना घुसखोरांना ठार केले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जैश-ए-मोहम्मदचे 7 दहशतवादी बीएसएफ जवानांनी ठार केले. ठार झालेले जैशचे 7 भारताच्या हद्दीत घुसखोरीचा प्रयत्न करण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती समोर आली आहे.

पाकिस्तानची भंबेरी

जम्मू-काश्मीर, पंजाब आणि राजस्थानमध्ये पाकिस्तानने केलेले क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले उधळून लावल्यानंतर, गुरुवारी रात्री उशिरा भारताने योग्य प्रत्युत्तर दिले. भारतीय सैन्याने इस्लामाबाद, लाहोर, सियालकोट आणि कराची येथे हल्ले केले. त्यामुळे आता पाकिस्तानची भंबेरी उडाली आहे.

advertisement

काल रात्री पाकिस्तानने केलेल्या जोरदार गोळीबारानंतर जम्मू आणि काश्मीरच्या सीमावर्ती गावात नागरिकांची घरे आणि दुकाने जळाली आणि त्यांचे नुकसान झाले. जम्मू आणि काश्मीरमधील सीमावर्ती शहरात पाकिस्तानने केलेल्या विनाकारण गोळीबारात वाहने आणि दुकानांचे नुकसान झाले.

मराठी बातम्या/देश/
BSF : आर्मी, एअर फोर्सनंतर बीएसएफने दाखवला दम, जैशच्या 7 दहशतवाद्यांचा खात्मा, पुरावाही दिला
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल