रेल्वे मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, उत्तर पश्चिम रेल्वे, कार्मिक सार्वजनिक तक्रार आणि पेन्शन मंत्रालयाने संयुक्तपणे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी नवीन प्रणाली लागू केली आहे. या अंतर्गत, पेन्शन आणि पेन्शनर्स कल्याण विभागाने राष्ट्रव्यापी डिजिटल जीवन प्रमाणपत्र मोहीम 3.0 सुरू केली आहे. आता रेल्वे पेन्शनधारकांना दरवर्षी दिले जाणारे जीवन प्रमाणपत्र घरी बसून देता येणार आहे. ॲपच्या मदतीने ही सुविधा घेता येईल.
advertisement
महिलेने लढवली वेगळी शक्कल, रेल्वे प्रवाशांना देते जेवण, वर्षाला 8 लाखांची कमाई
800 शहरांमध्ये सुविधा उपलब्ध होणार आहे
नेशन वाइड डिजिटल लाइफ सर्टिफिकेट कॅम्पेन 3.0 च्या माध्यमातून 800 शहरांमध्ये ही सुविधा दिली जाईल. नवीन सुविधा सुरू केल्यानंतर, उत्तर पश्चिम रेल्वेच्या 50 हजारांहून अधिक पेन्शनधारकांना स्टेट बँक ऑफ इंडियाकडून त्यांचे पेन्शन पेमेंट मिळू शकणार आहे. यासाठीची सुविधा रेल्वेच्या सर्व झोन आणि विभागांच्या बँकांमध्ये चालवली जाईल.
अशा प्रकारे जीवन प्रमाणपत्र घरबसल्या बनवले जाईल
रेल्वे मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, यासाठी एक ॲप लॉन्च करण्यात आले आहे. ज्याद्वारे फेस ऑथेंन्टिकेशन टेक्नॉलॉजीद्वारे पेन्शनधारकाचा चेहरा स्कॅन करून जीवन प्रमाणपत्र जारी केले जाऊ शकते. ॲपमध्ये इन्स्टॉल केलेला स्कॅनर ओपन होताच मोबाईल चेहऱ्यासमोर घ्यावा लागेल, त्यामुळे प्रमाणपत्र तयार होईल. दूरवर राहणाऱ्या पेन्शनधारकांना या सुविधेचा सर्वाधिक फायदा होणार आहे. ते बँकेत न जाता घरी बसून जीवन प्रमाणपत्र देऊ शकतील आणि कोणत्याही अडचणीशिवाय पेन्शनचे नियमित पेमेंट घेऊ शकतील.