TRENDING:

Israel Iran Conflict: अहमदाबाद विमान अपघातानंतर मोठं अस्मानी संकट, अनेक विमानं टेकऑफनंतर दिल्ली आणि मुंबईत रिटर्न

Last Updated:

Israel Iran Conflict: एअर इंडियाचे विमान AI171 अपघातग्रस्त; 241 प्रवासी मृत. भारत-इस्रायल संघर्षामुळे एअर इंडियाने काही विमानं डायव्हर्ट व काही रद्द केली आहेत. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी निर्णय.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
एअर इंडियाचे विमान AI171 अपघातग्रस्त झालं. यामध्ये 241 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. ही घटना ताजी असताना भारतावर अस्मानी संकट कोसळलं आहे. भारतातून उड्डाण करणाऱ्या विमानांना आता परत बोलवलं जात आहे. काही विमानं डायव्हर्ट केली जात आहेत. तर काही विमानं रद्द करण्यात आली आहेत. भारत इस्रायल संघर्ष सुरू झाल्याने त्याचे पडसाद उमटत आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव विमानं डायव्हर्ट करत आहोत किंवा पुन्हा बोलवत आहोत असं एअर इंडियाने आपल्या निवेदनात म्हटलं आहे. एअर इंडियाने आपल्या विमानांचे अपडेट्स सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
News18
News18
advertisement

इराण आणि इस्रायलमध्ये जिथे संघर्ष झाला त्यामुळे तिथले हवाई क्षेत्र बंद करण्यात आलं आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेमुळे, एअर इंडियाच्या खालील उड्डाणे एकतर वळवली जात आहेत किंवा त्यांच्या मूळ ठिकाणी परत पाठवली जात आहेत, या अनपेक्षित व्यत्ययामुळे प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल खेद आहे आणि प्रवाशांना राहण्याची व्यवस्था करण्यासह ती कमी करण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. रद्द केल्यास किंवा मोफत वेळापत्रकात बदल केल्यास परतफेड देखील केली जात आहे. प्रवाशांना त्यांच्या गंतव्यस्थानावर पोहोचवण्यासाठी पर्यायी व्यवस्था केली जात आहे.

advertisement

असं ट्विट करुन माहिती दिली आहे.

AI130 – London Heathrow-Mumbai – Diverted to Vienna

AI102 – New York-Delhi – Diverted to Sharjah

AI116 – New York-Mumbai – Diverted to Jeddah

AI2018 – London Heathrow-Delhi – Diverted to Mumbai

AI129 – Mumbai-London Heathrow – Returning to Mumbai

AI119 – Mumbai-New York – Returning to Mumbai

advertisement

AI103 – Delhi-Washington – Returning to Delhi

AI106 – Newark-Delhi – Returning to Delhi

AI188 – Vancouver-Delhi – Diverting to Jeddah

AI101 – Delhi-New York – Diverting to Frankfurt/Milan

AI126 – Chicago-Delhi – Diverting to Jeddah

AI132 – London Heathrow-Bengaluru – Diverted to Sharjah

AI2016 – London Heathrow-Delhi – Diverted to Vienna

advertisement

AI104 – Washington-Delhi – Diverted to Vienna

AI190 – Toronto-Delhi – Diverted to Frankfurt

AI189 – Delhi-Toronto – Returning to Delhi

इस्त्रायल आणि पॅलेस्टाइनमध्ये संघर्ष सुरू आहे. हा संघर्ष सुरू असताना आता इस्त्रायलने आणखी एका देशावर हल्ला केला. इस्रायलने इराणवर हल्ला केला आहे. इस्रायली सैन्याने इराणची राजधानी तेहरानवर बॉम्ब हल्ला केला आहे. तसेच इराणी लष्करी आणि अणु तळांना देखील इस्रायलने टार्गेट केलं आहे. त्यांच्यातील संघर्ष वाढत असल्याने जगाचं टेन्शन वाढलं आहे. आधीच युक्रेन संघर्षामुळे टेन्शन होतं आता नव्या परिस्थितीमुळे युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. या संघर्षाचा फटका भारतालाही बसत आहे.

advertisement

मिळालेल्या माहितीनुसार, आयएएफच्या डझनभर फायटर विमानांनी इराणवरील हल्ल्याचा पहिला टप्पा पूर्ण केला आहे. ज्यात इस्त्रायलने इराणच्या विविध भागातील अण्वस्त्र ठिकाणांसह डझनभर लष्करी तळांवर हल्ले केले.सध्याच्या घडीला इराण अण्वस्त्र निर्मितीच्या अगदी जवळ आहे. इराणी राजवटीच्या हातात असलेली मोठ्या प्रमाणातील विनाशकारी शस्त्रे इस्रायल राष्ट्रासाठी आणि संपूर्ण जगासाठी धोकादायक आहेत, याच कारणातून इस्त्रालयने इराणवर हल्ला केला आहे.

मराठी बातम्या/देश/
Israel Iran Conflict: अहमदाबाद विमान अपघातानंतर मोठं अस्मानी संकट, अनेक विमानं टेकऑफनंतर दिल्ली आणि मुंबईत रिटर्न
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल