TRENDING:

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दूरध्वनी

Last Updated:

बेंजामिन नेतन्याहू आणि नरेंद्र मोदी यांनी दूरध्वनीवर संवाद साधून नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या, दहशतवादाविरुद्ध लढण्याचा निर्धार केला आणि गाझा शांतता योजनेवर चर्चा केली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरध्वनीवरून संवाद साधला.दोन्ही नेत्यांनी एकमेकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. त्यांनी दोन्ही देशांच्या जनतेला शांती व समृद्धीच्या सदिच्छा दिल्या.
News18
News18
advertisement

लोकशाही मूल्ये,परस्पर विश्वास आणि दूरदृष्टी यांच्या आधारावर भारत-इस्रायल भागीदारी मजबूत करण्यासाठी त्यांनी समान उद्दिष्टे निश्चित केली.त्यांनी सर्व प्रकारच्या आणि स्वरूपातील दहशतवादाविरुद्ध शून्य सहनशीलतेच्या दृष्टिकोनाचा आणि दहशतवादाविरुद्ध लढण्याच्या बांधिलकीचा पुनरुच्चार केला.

नेतन्याहू यांनी गाझा शांतता योजनेच्या अंमलबजावणीबद्दल मोदी यांना माहिती दिली. या प्रदेशात न्याय्य आणि शाश्वत शांततेसाठीच्या प्रयत्नांना भारताचा सातत्यपूर्ण पाठिंबा असल्याचा  पुनरुच्चार  पंतप्रधानांनी केला.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
गुलाबाच्या शेतीमध्ये घेतलं बोराचं आंतरपीक, उत्पन्न मिळणार लाखात, कशी केली शेती?
सर्व पहा

त्यांनी परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक विषयांवरही विचारांची देवाणघेवाण केली. परस्परांच्या संपर्कात राहण्याला दोन्ही नेत्यांनी संमती दर्शविली.

मराठी बातम्या/देश/
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दूरध्वनी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल