वैज्ञानिकांनी आता नवीन उद्दिष्टांसह काम सुरू केलं आहे. चंद्रावरून मातीचे नमुने पृथ्वीवर आणणं हे या चांद्रयान-4 मोहिमेचं उद्दिष्ट आहे. यामुळे अंतराळ संशोधनात आघाडीवर असलेल्या देशांपैकी भारत हा एक देश ठरेल. या मोहिमेतील लँडिंग चांद्रयान-3 प्रमाणेच असेल, असं स्पेस अॅप्लिकेशन सेंटरचे (SAC) संचालक नीलेश देसाई यांनी पुण्यात सांगितलं. ते भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्थेच्या 62 व्या स्थापनादिनाच्या समारंभात बोलत होते.
advertisement
नीलेश देसाई म्हणाले की, चांद्रयान-4 चे केंद्रीय मॉड्युल चंद्राभोवती फिरणाऱ्या मॉड्युलसह लँडिंगनंतर परत येईल. जे नंतर पृथ्वीच्या वातावरणाजवळ वेगळं होईल. यासोबतच री-एंट्री मॉड्युल चंद्रावरील खडक आणि मातीचे नमुने घेऊन परत येईल.
हवामानामध्ये बदल का होतोय? नासा आणि इस्रोचं खास मिशन, संपूर्ण माहिती
हे एक अतिशय महत्त्वाकांक्षी मिशन आहे. येत्या पाच-सात वर्षांत चंद्राच्या पृष्ठभागावरून नमुने आणण्याचं हे आव्हान आम्ही पूर्ण करू, अशी आशा आहे. ही मोहीम चांद्रयान-3 पेक्षा अधिक गुंतागुंतीचं असण्याची शक्यता आहे.
चांद्रयान-3 मध्ये 30 किलो वजनाचा रोव्हर होता, तर चांद्रयान-4 मध्ये त्याच्या दसपटीहून अधिक म्हणजे 350 किलो वजनाचा रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरवण्याची योजना आहे. चांद्रयान-4 मोहिमेचे उद्दिष्ट चंद्राच्या अशा भागात लँडिंग करण्याचं आहे, ज्या भागाचा अद्याप शोध लागलेला नाही.
रोव्हरच्या शोध मोहिमेचे क्षेत्र 1 किलोमीटर x 1 किलोमीटर आहे. जे चांद्रयान-3 च्या 500 मीटर x 500 मीटरपेक्षा खूप मोठे असेल. चांद्रयान-4 चे यश चंद्रावरील मातीचे नमुने पृथ्वीवर परत आणण्याच्या क्षमतेवर अवलंबून आहे.
भारतातले 'एलन मस्क', हैदराबादमध्ये खासगी कंपनीने बनवलं रॉकेट, पण ISRO ची लागणार मदत
या ऑपरेशनमध्ये दोन लाँच रॉकेटचा समावेश असेल, ज्यातून या मोहिमेचं मोठं स्वरूप आणि गुंतागुंत किती आहे हे दिसतं. ISRO जपानी अंतराळ एजन्सी JAXA सोबत दुसर्या चांद्र मोहिमेवर, LuPEX वर देखील सहकार्य करत आहे. ही मोहीम चंद्राच्या अंधार असलेल्या बाजूचा शोध घेईल. या मोहिमेमध्ये 350 किलो वजनाचा रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावरील 90 अंशांपर्यंतच्या परिसरात शोधमोहिम राबवेल.