TRENDING:

Chandrayaan-4: आता चंद्रावरील सँपल पृथ्वीवर आणणारा ISRO; चांद्रयान-4 ची तयारी सुरू, असं असेल मिशन -

Last Updated:

चांद्रयान-3 ची रचना अशा प्रकारे करण्यात आली नव्हती, की ते पृथ्वीवर परत येऊ शकेल. आता चांद्रयान-4 चंद्रावर जाईल, लँड करेल आणि तिथून काही सँपल घेऊन पृथ्वीवर परत येईल.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई 24 नोव्हेंबर : चांद्रयान-3 च्या यशानंतर इस्रोचं मनोबल खूप उंचावलं आहे. अंतराळ मोहिमांच्या इतिहासात कोणत्याही देशानं आपलं अंतराळ यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरवण्याची ही पहिलीच वेळ होती. चांद्रयान-3 नंतर भारतीय अंतराळ संस्था इस्रोने आपल्या चंद्र मोहिमेची चांद्रयान-4 ची तयारी सुरू केली आहे. यासाठी त्यांनी जपानच्या JAXA या स्पेस एजन्सीसोबतही भागीदारी केली आहे. ही चौथी चंद्र मोहीम मागील मोहिमांपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे.
चांद्रयान-4 ची तयारी सुरू
चांद्रयान-4 ची तयारी सुरू
advertisement

चांद्रयान-3 ची रचना अशा प्रकारे करण्यात आली नव्हती, की ते पृथ्वीवर परत येऊ शकेल. परंतु चांद्रयान-3 च्या रोव्हर आणि विक्रम लँडरने 14 दिवसांसाठी इस्रोला महत्त्वपूर्ण माहिती आणि डेटा उपलब्ध करून दिला. आता चांद्रयान-4 चंद्रावर जाईल, लँड करेल आणि तिथून काही सँपल घेऊन पृथ्वीवर परत येईल.

ही माती आहे अनमोल, ठेवली जाते तिजोरीत, खरेदीसाठी लागते बोली, पण कारण काय?

advertisement

काही दिवसांपूर्वी, स्पेस अॅप्लिकेशन सेंटर (SAC/ISRO) संचालक नीलेश देसाई यांनी इंडियन ट्रॉपिकल मेट्रोलॉजी इंस्टिट्यूटला संबोधित करताना, इस्रोच्या चंद्रावरील चौथ्या मोहिमेची माहिती दिली होती. ते म्हणाले होते, 'अंतराळयान चंद्रावर जाईल, लँड करेल, नमुने गोळा करेल आणि नंतर अंतराळातील दुसर्‍या मॉड्यूलशी कनेक्ट होईल. जेव्हा दोघे पृथ्वीच्या जवळ येतील तेव्हा ते पुन्हा वेगळे होतील आणि एक मजबूत वेग निर्माण करतील. यानंतर एक भाग पृथ्वीवर येईल, तर दुसरा भाग पृथ्वीभोवती फिरत राहील.'

advertisement

येत्या 5 ते 7 वर्षांत त्याची तयारी पूर्ण होईल, असं SAC चे संचालक म्हणाले. हे एक महत्त्वाकांक्षी मिशन आहे. चांद्रयान-4 मागील सर्व मोहिमांपेक्षा खूपच कठीण असेल. चांद्रयान-3 च्या रोव्हरचं वजन 30 किलो होतं, परंतु चांद्रयान-4 मध्ये त्याचं वजन 350 किलोपर्यंत वाढणार आहे. रोव्हरचा आकार मागील मिशनमध्ये 500mX500m च्या तुलनेत आता 1000mX1000m इतका वाढेल.

advertisement

मराठी बातम्या/देश/
Chandrayaan-4: आता चंद्रावरील सँपल पृथ्वीवर आणणारा ISRO; चांद्रयान-4 ची तयारी सुरू, असं असेल मिशन -
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल