ही माती आहे अनमोल, ठेवली जाते तिजोरीत, खरेदीसाठी लागते बोली, पण कारण काय?
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
तसेच असे फक्त एकाच दुकानात नाही होत.
रजत भटृ, प्रतिनिधी
गोरखपुर, 23 नोव्हेंबर : तुम्हाला असं वाटत असेल माती ही सामान्य असते. तुमचंही योग्यच आहे. मात्र, एका ठिकाणी एक माती अशी आहे, जी चक्क तिजोरीत ठेवली जाते. ही माती याठिकाणी अनमोल मानली जाते. इतकंच नव्हे तर या मातीच्या खरेदीसाठी चक्क बोलीही लावली जाते. यामागचे नेमकं कारण काय आहे, हे जाणून घेऊयात.
advertisement
उत्तरप्रदेशच्या गोरखपूरमध्ये एक अशी गल्ली आहे, ज्याठिकाणी दुकानदार दुकानाची माती आणि कचऱ्याला जमा करतात. यानंतर, ज्याप्रकारे लोक आपल्या घरातील सोन्याला जपून ठेवतात, त्याप्रकारे याला एका विशिष्ट पद्धतीने ठेवले जाते. येथील दुकानदार अगदी त्याच पद्धतीने या माती आणि कचऱ्याला ठेवतात. तसेच यावर बोलीही लावली जाते. लोकं ही माती खरेदी करायलाही येतात.
advertisement
तसेच असे फक्त एकाच दुकानात नाही होत. तर या गल्लीमध्ये जवळपास 50 ते 60 अशी दुकाने आहेत, जे कचरा मातीला बाहेर फेकत नाहीत. या लोकांनी आपल्या दुकानातच एक खड्डा खोदला असून यामध्ये ते या वस्तू टाकतात. हे काम मागील अनेक वर्षांपासून सुरू आहे.
गोरखपूरच्या घंटाघरच्या मागे एक गोपीगली आहे. याठिकाणी 100 पेक्षा अधिक दुकाने आहेत. यामध्ये काही दुकानांवर सोने विक्री केली जाते. तर काही दुकानांवर मॅन्युफॅक्चरिंग आणि शायनिंगचे काम केले जाते. करिश्मा ज्वेलर्सचे मालक मनोज कुमार वर्मा सांगतात की, याठिकाणी असे अनेक मॅन्युफॅक्चरिंग आणि शायनिंगची कामे केली जाणारी दुकाने आहेत. हे दुकानवाले लोक आपल्या मातीला दुकानातील खड्ड्यात टाकतात. मग त्याला विकतात. या मातीला खरेदीसाठी प्रत्येक दुकानावर एक व्यक्ती (नियारिया) येतो. हा ही माती खरेदी करुन घेऊन जातो. यानंतर तो त्या मातीतले सोन्याचे छोटे छोटे कण निवडतो.
advertisement
जेव्हा या दुकानांवर मॅन्युफॅक्टरिंगचे काम, किंवा सोन्याला चमकवण्याचे काम करत असताना, सोन्याचे लहान लहान कण पडतात. काही कण त्यांच्या शरीरावर चिपकतात. यानंतर काम संपल्यावर दुकानदार हे सर्व झाडून घेतात आणि दुकानातील खड्ड्यात टाकतात. महिन्यातील एक दिवस नियारिया येतो आणि कमीत कमी 5 हजार रुपयात खरेदी करतो. यानंतर तो त्यातील सोन्याचांदीचे कण निवडून बाजारात 10 ते 12 हजारांना विकतो.
Location :
Uttar Pradesh
First Published :
November 23, 2023 11:56 AM IST