जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरू आहे. लष्कराने एका दहशतवाद्याला ठार केले आहे. काश्मीर पोलिसांनी ही माहिती दिली आहे. पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपोरा येथे सुरक्षा दलांनी दोन-तीन दहशतवाद्यांना घेरले. त्यापैकी एक मारला गेला, बरेच जण अजूनही लपून बसले आहेत. सध्या दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू आहे. लष्कराचे जवान दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर देत असल्याची माहिती देण्यात आली आहे.
advertisement
वृत्तानुसार, पाकिस्तानस्थित दहशतवादी गट जैश-ए-मोहम्मदचे दोन ते तीन दहशतवादी या भागात लपले असण्याची शक्यता आहे. लष्कराने आतापर्यंत एका दहशतवादीला ठार मारण्यात आले आहे. सध्या दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू आहे. दोन दिवसांपूर्वीच शोपियानमध्ये तीन दहशतवादी मारले गेले असताना आता पुलवामामध्ये दहशतवाद्यांसोबत चकमक सुरू आहे. चकमक सुरू असलेला परिसर पूर्णपणे सील करण्यात आला आहे.
शोपियानच्या चकमकीत दहशतवाद्यांचा म्होरक्या ठार
शोपियान जिल्ह्यात झालेल्या चकमकीत लष्कर-ए-तोयबाचा 'ऑपरेशन कमांडर' शाहिद कुट्टेसह तीन दहशतवादी मारले गेले होते. एका अधिकाऱ्याने सांगितले की, कुट्टेवर काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांची भरती करण्याची जबाबदारी होती. त्याने अनेक तरुणांना लष्कर-ए-तोयबामध्ये सामील होण्यासाठी आमिष दाखवले होते.
अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी शुक्रू केलर भागात झालेल्या चकमकीत कुट्टे यांच्यासह शोपियानच्या वंदुना मेल्हुरा भागातील रहिवासी अदनान शफी आणि शेजारच्या पुलवामा जिल्ह्यातील मुरान भागातील रहिवासी एहसान उल हक शेख हे देखील ठार झाले. तिन्ही दहशतवादी दक्षिण काश्मीरमध्ये बऱ्याच काळापासून सक्रिय होते आणि अनेक दहशतवादी हल्ले करण्यात सहभागी होते.
अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, दक्षिण काश्मीरमधील लष्कर-ए-तोयबाचा 'ऑपरेशन कमांडर' कुट्टे याने काश्मीरमध्ये दहशतवादी भरतीला प्रोत्साहन दिले, अनेक तरुणांना आमिष दाखवले आणि अनेक निष्पाप लोकांना ठार मारले. या चकमकीमुळे लष्कर-ए-तैयबा आणि इतर दहशतवादी संघटनांचे मोठे नुकसान झाले आहे.