त्रालच्या नादेर भागात मारले गेलेले हे तीन दहशतवादी जैश-ए-मोहम्मदशी संबंधित होते. त्रालमधील चकमकीत आसिफ अहमद शेख, आमिर नझीर वाणी आणि यावर अहमद भट या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.
पुलवामा चकमकीत मारल्या गेलेल्या सर्व दहशतवाद्यांची ओळख पटली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यांचे पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदशी संबंध उघड झाले आहेत. हे सर्वजण अवंतीपोराच्या त्राल भागात लपले होते. सुरक्षा दलांना गुप्तचर माहिती मिळाली होती. यानंतर, सुरक्षा दलांनी शोध मोहीम राबविण्यासाठी त्राल तहसीलमधील नादेर गावाला वेढा घातला. सुरक्षा दल लपलेल्या दहशतवाद्यांकडे पोहोचताच गोळीबार सुरू झाला. यानंतर सुरक्षा दलांनी चोख प्रत्युत्तर दिले.
advertisement
सुरक्षा दलाच्या जवानांनी तिघांचा खात्मा केला. त्यानंतर एकाची ओळख उघड झाली आहे. सूत्रांचे म्हणणे आहे की पुलवामा येथील त्राल चकमकीत मारला गेलेला दहशतवादी आसिफ शेख आहे. तो जैश-ए-मोहम्मदचा कमांडर होता. या आठवड्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेली ही दुसरी चकमक आहे. गेल्या 48 तासांत सुरक्षा दलांनी अशा प्रकारे 6 दहशतवाद्यांना ठार मारले आहे. दोन दिवसांपूर्वी शोपियानमध्ये सुरक्षा दलांनी तीन दहशतवाद्यांना ठार मारले होते. 13 मे रोजी शोपियान जिल्ह्यात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत लष्कर-ए-तोयबाचे (एलईटी) 3 दहशतवादी मारले गेले.
शोपियानच्या चकमकीत दहशतवाद्यांचा म्होरक्या ठार
शोपियान जिल्ह्यात झालेल्या चकमकीत लष्कर-ए-तोयबाचा 'ऑपरेशन कमांडर' शाहिद कुट्टेसह तीन दहशतवादी मारले गेले होते. एका अधिकाऱ्याने सांगितले की, कुट्टेवर काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांची भरती करण्याची जबाबदारी होती. त्याने अनेक तरुणांना लष्कर-ए-तोयबामध्ये सामील होण्यासाठी आमिष दाखवले होते.
अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी शुक्रू केलर भागात झालेल्या चकमकीत कुट्टे यांच्यासह शोपियानच्या वंदुना मेल्हुरा भागातील रहिवासी अदनान शफी आणि शेजारच्या पुलवामा जिल्ह्यातील मुरान भागातील रहिवासी एहसान उल हक शेख हे देखील ठार झाले. तिन्ही दहशतवादी दक्षिण काश्मीरमध्ये बऱ्याच काळापासून सक्रिय होते आणि अनेक दहशतवादी हल्ले करण्यात सहभागी होते.