पटणा: बिहार विधानसभा निवडणुकीच्या तारखा लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे आणि त्यापूर्वीच राज्याचे राजकीय वातावरण तापले आहे. विविध सर्वेक्षण संस्थांनी आपले आकडे गोळा करण्यास सुरुवात केली आहे. याच संदर्भात 'वोट वाइब' (Vote Vibe) या संस्थेने बिहार निवडणुकीबद्दल एक सर्वेक्षण केले आहे. ज्यातून अनेक धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. हे सर्वेक्षण ३ ते १० सप्टेंबर दरम्यान करण्यात आले असून यात एकूण ५,६३५ लोकांचे नमुने घेतले गेले. हे सर्वेक्षण महत्त्वाचे ठरते, कारण त्याआधी १७ ऑगस्ट ते १ सप्टेंबर दरम्यान राहुल गांधी यांची 'व्होटर अधिकार यात्रा' बिहारमध्ये झाली होती. ज्यात तेजस्वी यादव आणि राहुल गांधी यांनी २२ हून अधिक जिल्ह्यांमध्ये दौरे केले होते.
advertisement
सर्वेक्षणाचे मुख्य निष्कर्ष
पुरुष: ५२%, महिला: ४८%
जातीनुसार विभागणी:
अनुसूचित जाती (SC): २०%
अनुसूचित जमाती (ST): २%
इतर मागासवर्गीय (OBC): ४४%
उच्च जाती (Upper Caste): १६%
मुस्लिम: १८%
क्षेत्रानुसार विभागणी:
शहरी: ३०%
ग्रामीण: ७०%
नीतीश सरकारविरोधी लाट?
सर्वेक्षणामधील एक महत्त्वाचा प्रश्न असा होता की- मुख्यमंत्री नीतीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील NDA सरकारबद्दल लोकांचे मत काय आहे? सत्ताविरोधी (anti-incumbency) भावना आहे की सरकारच्या बाजूने (pro-incumbency) कल आहे?
आकडे आश्चर्यकारक
४८% लोकांनी स्पष्टपणे सांगितले की, बिहारमध्ये एक मजबूत सत्ताविरोधी लाट आहे.
२७.१% लोकांनी सरकारचे समर्थन केले.
२०.६% लोकांनी आपली भूमिका तटस्थ (neutral) ठेवली.
४.३% लोकांनी 'माहित नाही' असे उत्तर दिले.
शहरी आणि ग्रामीण भागांतील कल
शहरी भागातील:
४८% लोकांनी सरकारविरोधी भूमिका घेतली.
३१% लोकांनी सरकारला पाठिंबा दिला.
१७% लोक तटस्थ होते.
ग्रामीण भागातील:
४८% लोकांनी सरकारविरोधी भूमिका घेतली.
२५% लोकांनी सरकारला पाठिंबा दिला.
२२% लोक तटस्थ होते.
या आकडेवारीनुसार शहरी आणि ग्रामीण दोन्ही भागांमध्ये सरकारविरोधी भावना सारखीच आहे. जी जवळपास ४८% इतकी आहे.
सर्वेक्षणातून असे दिसून आले आहे की, पुरुष आणि महिलांमध्येही सरकारविरोधी भावना समान आहे.
४८% पुरुष आणि ४८% महिलांनी सत्ताविरोधी लाट असल्याचे सांगितले.
२०% पुरुष आणि २२% महिला तटस्थ होत्या.
२९% पुरुष आणि २५% महिलांनी सरकारला पाठिंबा दिला.
नीतीश फॅक्टर कमकुवत होतोय का?
हे सर्वेक्षण राहुल गांधींच्या 'व्होटर अधिकार यात्रे'नंतर झाले असले तरी या यात्रेचा RJD किंवा काँग्रेसला थेट फायदा होईल असे स्पष्टपणे दिसून येत नाही. मात्र या आकडेवारीवरून हे नक्कीच स्पष्ट होते की बिहारमध्ये सत्ताविरोधी लाट आहे. नीतीश कुमार हे दीर्घकाळापासून बिहारच्या राजकारणाचा चेहरा असले तरी हे सर्वेक्षण दर्शवते की आता जनता बदलाच्या शोधात आहे. विशेषतः तरुण, महिला आणि ग्रामीण मतदार आता नवीन पर्याय शोधत आहेत.