TRENDING:

धावती बस कशी बनली आगीचा गोळा, महामार्गावरचा पहिला VIDEO, धक्कादायक कारण समोर

Last Updated:

कुरनूलजवळ NH 4 वर कावेरी ट्रॅव्हल्सच्या व्होल्वो बसला अपघात होऊन आग लागली. २० मृत, १५ जखमी. एन. चंद्राबाबू नायडू व वायएस जगन मोहन रेड्डी यांनी शोक व्यक्त केला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पहाटेची वेळ बस सुस्साट महामार्गावरुन धावत होती. प्रवासी साखर झोपेत होते, अचानक धडकल्यासारखं झालं आणि प्रवासीही जागे झाले, त्यानंतर असं काही घडलं की पुढच्या 10 मिनिटात होत्याचं नव्हतं झालं. आंध्र प्रदेशातील कुरनूल इथे पहाटे एक अत्यंत हृदयद्रावक अपघात झाला. बंगळूर-हैद्राबाद राष्ट्रीय महामार्ग NH 4 वर चिन्थे पार्कजवळ एका दुचाकीला धडकल्यानंतर व्होल्वो बसने अचानक पेट घेतला. आग इतकी भयंकर होती की संपूर्ण बस जळून खाक झाली. या भीषण दुर्घटनेत १० प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला असून, १५ हून अधिक प्रवासी जखमी झाले आहेत.
News18
News18
advertisement

दुचाकीच्या धडकेनंतर आग भडकली

कुरनूलचे पोलीस अधीक्षक विक्रांत पाटील यांनी या दुर्घटनेची माहिती दिली. " पहाटे ३ वाजता कावेरी ट्रॅव्हल्सची व्होल्वो बस हैदराबादहून बंगळूरकडे जात होती. त्याचवेळी बसची एका दुचाकीसोबत टक्कर झाली. ती दुचाकी बसच्या खाली अडकल्यामुळे घर्षणातून ठिणगी उडाली आणि बसने क्षणार्धात पेट घेतला," अशी माहिती त्यांनी दिली. आग लागल्यानंतर एसी बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना खिडक्या तोडून बाहेर पडावे लागले. पाटील यांनी सांगितले की, "जे प्रवासी खिडक्या तोडून बाहेर पडू शकले, ते सुरक्षित आहेत."

advertisement

एसी बसमध्ये 42 प्रवासी होते

या बसमध्ये दोन ड्रायव्हर्ससह एकूण ४० लोक प्रवास करत होते. अपघातानंतर बसमधील 20 प्रवाशांचा मृत्यू झाला. याशिवाय, १५ लोकांना वाचवण्यात यश आले असून त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ११ जखमींवर सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर इतर तिघांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आग विझवण्यात यश आले असून, बस पूर्णपणे जळून खाक झाली आहे.

advertisement

मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूंकडून दु:ख व्यक्त

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी या भीषण बस दुर्घटनेबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. त्यांनी 'एक्स'वर (माजी ट्विटर) पोस्ट करत म्हटले, "कुरनूल जिल्ह्यातील चिन्ना टेकुर गावाजवळ घडलेल्या बस अपघाताबद्दल ऐकून मला खूप दुःख झाले आहे. ज्या कुटुंबांनी आपले प्रियजन गमावले आहेत, त्यांच्या दुःखात मी सहभागी आहे." नायडू यांनी सरकारी अधिकाऱ्यांनी जखमींना आणि पीडित कुटुंबांना सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. याशिवाय, आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि वायएसआरसीपी अध्यक्ष वायएस जगन मोहन रेड्डी यांनीही या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे.

advertisement

राजस्थानातील बस अपघाताची आठवण

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीन दर वाढ आजही नाहीच, कांदा अन् मक्याला काय मिळाला भाव? Video
सर्व पहा

८ दिवसांपूर्वी राजस्थानमध्ये खासगी बसला आग लागून 20 प्रवासी होरपळले होते. आगीचा भडका उडाल्याने दरवाजा लॉक झाला आणि त्यामुळे प्रवाशांना बाहेर पडता आलं नव्हतं. त्यामुळे प्रवाशांचा होपळून मृत्यू झाला होता. पुन्हा एकदा या दुर्घटनेची पुनरावृत्ती आंध्र प्रदेशमध्ये झाल्याने खळबळ उडाली आहे. खासगी बसने प्रवास करणाऱ्यांमध्ये काहीसं भीतीचं वातावरण आहे.

मराठी बातम्या/देश/
धावती बस कशी बनली आगीचा गोळा, महामार्गावरचा पहिला VIDEO, धक्कादायक कारण समोर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल