गेल्या महिन्यात मदुराई येथील वेस्ट वेली स्ट्रीटवरील एलआयसी ऑफिसमध्ये आग लागल्याची घटना घडली होती. या आगीत एका 54 वर्षीय महिलेचा जळून मृत्यू झाला. कल्याणी नंबी असं या महिलेचं नाव. ती तिथली सीनिअर ब्रांच मॅनेजर होती. तर 46 वर्षांचा सहाय्यक प्रशासकीय अधिकारी डी. रामही आगीत भाजला आहे.
डी रामने पोलिसांना सांगितलं की, एक मास्क घातलेली अज्ञात व्यक्ती ऑफिसमध्ये घुसली. कल्याणी यांचे दागिने चोरले आणि तिथं आग लावली. पण नंतर पोलीस तपासात ही नियोजीत हत्या असल्याचं समोर आलं. डी राम हाच आरोपी होती, पोलिसांनी त्याला अटक केली.
advertisement
नेमकं काय घडलं?
17 डिसेंबरच्या रात्री कल्याणी नंबी ऑफिसच्या दुसऱ्या मजल्यावर त्यांच्या केबिनमध्ये होत्या. तेव्हा डी रामने ऑफिसमधील लाइट घालवली. त्यानंतर पेट्रोल टाकून कल्याणीला जाळलं. हा अपघात वाटावा म्हणून त्यानेही स्वतःला भाजून घेतलं.
बाबांना 2-2 बायका, मला एकही नाही! लग्नासाठी आसुसलेला 35 वर्षांचा लेक, रागात वडिलांसोबत नको ते कृत्य
डी. रामचा जबाब सतत बदलत होता. तसंच घटनास्थळावरून काही महत्त्वाचे पुरावे जप्त करण्यात आल्यानंतर पोलिसांना ही हत्या असल्याचा संशय आला. एका छोट्याशा सुगाव्याने संपूर्ण प्रकरण उलटं फिरवले आणि हत्येचे गूढ उलगडलं. आरोपीच्या केबिनमधून पेट्रोलने भरलेल्या पाण्याच्या बाटल्या सापडल्या.
दुचाकीमधून पेट्रोल काढण्यासाठी वापरलेला पाईपही जप्त करण्यात आला. मृत्यूपूर्वी महिलेने तिच्या मुलाला फोन करून पोलिसांना बोलवण्यास सांगितलं होतं. आरोपीची कहाणी मुखवटा घातलेल्या दरोडेखोरांच्या सिद्धांताशी जुळत नव्हती.
हत्येचं कारण काय?
सुरुवातीला पोलिसांनीही हा अपघात मानला. पण नंतर तपासात दिसून आलं की, डी. राम यांच्याकडे बऱ्याच काळापासून 40 हून अधिक डेथ क्लेम्सच्या फाईल्स पेंडिंग होत्या. विमा एजंट सतत तक्रार करत होते. कल्याणी नंबी यांनी त्यांना बोलावून याबाबत विचारलं आणि हे प्रकरण त्यांच्या वरिष्ठांच्या निदर्शनास आणून देण्याची ताकीद दिली. यामुळे आरोपी संतप्त झाला. जर चौकशी झाली, सत्य समोर आलं तर आपल्याला नोकरी गमवावी लागेल, अशी भीती त्याला वाटली आणि त्याने कल्याणी यांच्या हत्येचा कट रचला.
रात्रीची वेळ आणि 5 चेहरे, संपूर्ण प्रशासन हादरलं! गर्ल्स हॉस्टेलमध्ये असं काय घडलं?
डी. रामने अतिशय काळजीपूर्वक प्लॅनिंग करून हा गुन्हा केला. त्याने आधी मुख्य वीजपुरवठा बंद केला. त्यानंतर त्याने तामिळनाडू वीज मंडळाला तांत्रिक बिघाड असल्याचा ईमेल पाठवला. त्यानंतर त्याने लॉबीचा मुख्य काचेचा दरवाजा बंद केला. अंधारात कल्याणीला संशय आल्याने तिने मदतीसाठी हाक मारली तेव्हा आरोपीने तिच्यावर पेट्रोल टाकलं आणि तिला जाळून टाकलं.
चौकशीदरम्यान डी. रामने रडत आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी सांगितलं की, इमारतीत आग लागलेली दिसावी म्हणून त्याने स्वत:च्या केबिनमध्येही आग लावण्याचा प्रयत्न केला. पण हाच डाव त्याच्याविरुद्ध सर्वात महत्त्वाचा पुरावा ठरला. डी रामवर आता अनेक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
