रात्रीची वेळ आणि 5 चेहरे, संपूर्ण प्रशासन हादरलं! गर्ल्स हॉस्टेलमध्ये असं काय घडलं?

Last Updated:

नीट विद्यार्थीनीच्या संशयास्पद मृत्यूमुळे आता एक राजकीय आणि प्रशासकीय वादळ निर्माण झालं आहे. हे प्रकरण आता फक्त एका विद्यार्थीनीच्या मृत्यूबद्दल राहिलेलं नाही, तर ते एका हाय-प्रोफाइल कव्हरअपची कहाणी सांगतं.

News18
News18
पाटणा : नीट परीक्षेची तयारी करणाऱ्या जहानाबाद येथील एका विद्यार्थीनीच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाने एक नवीन वळण घेतलं आहे. पोलिसांनी दिलेली सुरुवातीची माहिती आणि वैद्यकीय मंडळाच्या सविस्तर पोस्टमॉर्टम अहवालात मोठी तफावत समोर आली आहे. नीट विद्यार्थीनीच्या संशयास्पद मृत्यूमुळे आता एक राजकीय आणि प्रशासकीय वादळ निर्माण झालं आहे. हे प्रकरण आता फक्त एका विद्यार्थीनीच्या मृत्यूबद्दल राहिलेलं नाही, तर ते एका हाय-प्रोफाइल कव्हरअपची कहाणी सांगतं.
5 जानेवारी रोजी रात्री 9 वाजता विद्यार्थिनी तिच्या पालकांशी फोनवर अगदी नेहमीप्रमाणे बोलली. जेवायला जात असल्याचं सांगून तिने फोन ठेवला. 6 जानेवारी रोजी ती वसतिगृहात बेशुद्ध अवस्थेत आढळली. हॉस्टेलची वॉर्डन नीतू ठाकूरने मुलीच्या पालकांना कळवण्याऐवजी तिच्या एका मैत्रिणीचे वडील जे माजी सैनिक आहेत, त्यांना फोन केला. त्यांना फोन का केला? पालकांपासून सत्य का लपवलं गेलं? पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झाला का?
advertisement
पोलिसांंचा रिपोर्ट आणि पोस्टमॉर्टेम रिपोर्टमध्ये तफावत
पाटण्याचे एएसपी सदर अभिनव कुमार आणि वरिष्ठ एसएसपी कार्तिकेय शर्मा यांनी सुरुवातीला ज्या पद्धतीने हे प्रकरण झोपेच्या गोळ्यांचे सेवन आणि आत्महत्या म्हणून सादर केलं होतं ते आता शवविच्छेदन अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतर पूर्णपणे उघड झालं आहे.
advertisement
पोलिसांनी दावा केला होता की विद्यार्थिनीच्या शरीरावर जखमांच्या कोणत्याही खुणा नाहीत. पण शवविच्छेदन अहवालात मृताच्या मानेवर नखांच्या खुणा, छाती, मांडी आणि पाठीसह तिच्या शरीराच्या विविध भागांवर निळ्या खुणा आढळल्या. सर्वात भयानक म्हणजे, तिच्या गुप्तांगांवर आढळलेल्या जखमा स्पष्टपणे जबरदस्तीने केलेल्या लैंगिक संबंध आणि क्रूरतेकडे निर्देश करतात.
पोलिसांची संशयास्पद भूमिका
वसतिगृहाचे मालक मनीष कुमार रंजन, संचालक श्रवण अग्रवाल आणि त्यांची पत्नी नीलम अग्रवाल यांची आता चौकशी सुरू आहे. मनीष कुमार रंजनला अटक करण्यात आली होती, पण पोलिसांनी त्यांना रिमांडवर का घेतलं नाही आणि त्यांची कठोर चौकशी का केली नाही? कुटुंबीयांचा आरोप आहे की मनीष रंजनच्या प्रायव्हेट बॉडीगार्ड्सनी त्यांना रुग्णालयात घेरलं होतं आणि नीलम अग्रवाल हे प्रकरण हाताळण्याचा प्रयत्न करत होती.
advertisement
चित्रगुप्त नगर पोलीस स्टेशनच्या प्रभारी रोशनी कुमारी यांच्यावरही बोटं उचलली जात आहेत. प्रभावशाली लोकांच्या दबावाखाली तिने जाणूनबुजून सुरुवातीचा तपास कमकुवत केला का? वसतिगृहातील इतर मुलींचे जबाब नोंदवले गेले होते का?
शाहजहानंद क्लिनिक ते प्रभात मेमोरियल हॉस्पिटलपर्यंत करण्यात आलेला उपचार संशयास्पद आहे. डॉ. सतीश यांची भूमिका आणि त्यांच्या सुरुवातीच्या अहवालात, ज्यामध्ये कोणत्याही जखमा नव्हत्या असं म्हटल होतं, त्याची आता चौकशी सुरू आहे.
advertisement
मृताच्या मामाने सांगितलं की, जेव्हा मुलगी रुग्णालयात काही काळ शुद्धीवर आली तेव्हा तिने तिच्या आईशी बोलण्याचा प्रयत्न केला. जेव्हा तिच्या आईने विचारलं की काही गडबड आहे का, तेव्हा तिच्या डोळ्यात अश्रू आले. ती बोलू शकली नाही आणि नंतर कायमची गप्प झाली. तिला जबरदस्तीने गप्प करण्यासाठी तिला इंजेक्शन देण्यात आलं होतं का?
advertisement
स्थानिक आणि सूत्रांच्या मते, संध्याकाळ होताच गर्ल्स हॉस्टेलबाहेर लक्झरी गाड्यांच्या लांब रांगा लागायच्या. प्रश्न असा आहे की त्या गाड्यांमध्ये कोण येत असे आणि का? या हाय-प्रोफाइल व्यक्तींना वाचवण्यासाठी पोलिसांनी आणि डॉक्टरांनी आत्महत्येचा देखावा रचला का?
एसआयटीसमोरील आव्हानं
या संपूर्ण प्रकरणाची चौकशी आता महानिरीक्षक जितेंद्र राणा यांच्या नेतृत्वाखालील विशेष तपास पथक (एसआयटी) करत आहे. त्यांच्यासमोर अनेक ज्वलंत प्रश्न आहेत.
advertisement
1) घटनेच्या वेळी मुलीने घातलेले कपडे कुठे आहेत?
2) मोबाइल फोनमधून डिलीट केलेल्या डेटामुळे कोणते रहस्य उघड होईल?
3) वसतिगृहाच्या रजिस्टरमधून गेस्टची नावं का गहाळ आहेत?
4) त्या रात्री वसतिगृहाचा गार्ड कुठे होता?
5) व्हिसेरा रिपोर्ट येण्यापूर्वी पोलिसांनी आत्महत्या कसं म्हटलं?
६) शंभू गर्ल्स हॉस्टेलसमोर सीसीटीव्ही बसवले आहे, पण रस्त्याच्या गेटवर सीसीटीव्ही का नव्हता? आरोपी याच गेटमधून वसतिगृहात घुसला होता का?
एकंदरीत एम्सच्या तज्ज्ञांचं मत आणि फॉरेन्सिक लॅबचा अहवाल आता या प्रकरणातील शेवटचा दुवा ठरेल. आयजी जितेंद्र राणा यांच्या नेतृत्वाखालील एसआयटीच्या तपासात आता महत्त्वाचे खुलासे होण्याची अपेक्षा आहे.
view comments
मराठी बातम्या/देश/
रात्रीची वेळ आणि 5 चेहरे, संपूर्ण प्रशासन हादरलं! गर्ल्स हॉस्टेलमध्ये असं काय घडलं?
Next Article
advertisement
Nagpur News: 'बुलडोजर पॅटर्न'नं घर पाडलं, दंगलीच्या आरोपात चार महिने नवरा तुरुंगात, आता थेट नगरसेवक!
'बुलडोजर पॅटर्न'नं घर पाडलं, दंगलीच्या आरोपात चार महिने तुरुंगात आता थेट नगरसेवक
  • यंदाच्या महापालिका निवडणुकीत अनेक घडामोडी घडल्या असून काही आश्चर्यकारक निकाल ला

  • बुलडोझरच्या धक्क्याने या कुटुंबातील एका महिलेला थेट महापालिकेच्या सभागृहात पोहोच

  • अलिशा खान यांच्या रूपाने 'बुलडोझर पॉलिटिक्स'ला मतदारांनी चपराक दिल्याची चर्चा

View All
advertisement