मध्यरात्री रस्त्यावर फिरत होता तरुण; बॅग उघडताच आढळलं 2 कोटी किमतीचं असं काही.. पुण्यात खळबळ
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
मध्यरात्री शिरूरमधील बाबूरावनगर भागात एक व्यक्ती संशयास्पदरीत्या फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून शादाब रियाज शेख याला ताब्यात घेतले
पुणे : पुणे जिल्ह्यातील शिरूर परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे अमली पदार्थांच्या विरोधात पोलिसांनी एक मोठी मोहीम राबवली असून, तब्बल २ कोटी १० लाख रुपयांचे 'एमडी' (मेफेड्रॉन) ड्रग्ज जप्त केले आहे. शिरूर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) संयुक्त पथकाने ही धडक कारवाई केली.
शिरूर तालुक्यातील तरुणांमध्ये वाढत्या नशेच्या प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी पाळत ठेवली होती. शनिवारी (१७ जानेवारी) मध्यरात्री शिरूरमधील बाबूरावनगर भागात एक व्यक्ती संशयास्पदरीत्या फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून शादाब रियाज शेख (वय ४१) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडील बॅगेची झडती घेतली असता, पोलिसांना चक्क १ किलो ५२ ग्रॅम एमडी ड्रग्ज सापडले.
advertisement
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी किंमत: जप्त करण्यात आलेल्या अमली पदार्थांची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किंमत २ कोटी १० लाख ४० हजार रुपये इतकी प्रचंड आहे. ग्रामीण भागात एवढ्या मोठ्या प्रमाणात ड्रग्ज सापडल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी आरोपी शादाब शेख याच्यावर एनडीपीएस (NDPS) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.
advertisement
शिरूर पोलीस आणि गुन्हे शाखेचे पथक आता या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करत आहे. हे ड्रग्ज कोठून आणले गेले आणि पुण्यात ते कोणाला विकले जाणार होते, याचा सखोल तपास सुरू आहे. या कारवाईमुळे अमली पदार्थांच्या तस्करीचे मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Jan 19, 2026 10:00 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
मध्यरात्री रस्त्यावर फिरत होता तरुण; बॅग उघडताच आढळलं 2 कोटी किमतीचं असं काही.. पुण्यात खळबळ









