अहमदाबाद पोलिसांच्या गुन्हे शाखेने आरोपींना अटक केली आहे. अहमदाबाद सायबर क्राईमच्या डीसीपी लविना सिन्हा यांनी सांगितले की, या तिघांनी महाकुंभात आंघोळ करणाऱ्या महिलांचे व्हिडिओ इतर युट्युब चॅनेलनाही विकले होते. आरोपी हे व्हिडीओ चढ्या दराने विकण्याचा व्यवसाय करत होते.
याशिवाय, या आरोपींनी देशातील 60-70 रुग्णालयांचे सीसीटीव्ही कॅमेरे हॅक केल्याचाही संशय आहे. अटक केलेल्या आरोपींची ओळख पटली आहे. प्रयागराज येथील चंद्रप्रकाश फूलचंद, महाराष्ट्रातील लातूर येथील प्रज्वल अशोक तेली आणि महाराष्ट्रातील सांगली येथील प्रज राजेंद्र पाटील अशी आरोपींची नावे आहेत.
advertisement
युट्युब आणि टेलिग्रामवर व्हिडीओची विक्री...
अहमदाबाद गुन्हे शाखेने केलेल्या तपासानुसार, हे तिन्ही आरोपी युट्युब आणि टेलिग्रामवर चॅनेलवर महाकुंभमध्ये स्नान करणाऱ्या महिलांच्या व्हिडीओची विक्री करत असे. या विक्रीतून त्यांनी चांगली कमाई केली.
राजकोट येथील पायल हॉस्पिटलचा सीसीटीव्ही आयपी अॅड्रेसच्या माध्यमातून हॅक करण्यात होते. हे कृत्य देखील याच टोळीचे असण्याची शक्यता असल्याचे पोलिसांनी सांगितले.
आरोपींकडे प्रयागराजमधील महिलांचे व्हिडीओ ...
अहमदाबाद गुन्हे शाखेने महाराष्ट्रातून प्रज्वल अशोक तेली आणि प्रज राजेंद्र पाटील यांना अटक केली. दरम्यान, चंद्रप्रकाश फूलचंद यांना प्रयागराज येथून अटक करण्यात आली. आरोपींची अजूनही चौकशी सुरू आहे. प्रयागराज येथून अटक करण्यात आलेल्या आरोपी चंद्रप्रकाश फूलचंदच्या चॅनलवर महाकुंभमेळ्याचे व्हिडिओ अपलोड करण्यात आले होते. आता त्याने हा व्हिडिओ स्वतः अपलोड केला आहे की कोणाकडून खरेदी केला आहे याची चौकशी केली जात आहे.
दुसरीकडे, अहमदाबाद गुन्हे शाखेचे पथक 60 ते 70 वेगवेगळ्या रुग्णालयांचे सीसीटीव्ही हॅक झाल्याची शक्यता तपासत आहे. हे रॅकेट गेल्या एक वर्षापासून सुरू होते, यामध्ये अनेक महिलांचे व्हिडिओ या लोकांना विकल्याचे उघड झाले आहे. आता या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आरोपींना ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल.
रुग्णालयाचे सीसीटीव्ही हॅक...
महाराष्ट्रातील प्रज्वल तेली हा मुख्य आरोपी आहे. तिन्ही आरोपींनी 8 महिन्यांत लाखो रुपये कमावले. पोलिस तपासात असे दिसून आले की आरोपी हा व्हिडिओ 800 ते 2000 रुपयांना विकत होता. प्राथमिक तपासानुसार, रुग्णालयांचे आयपी अॅड्रेस रोमानिया आणि अटलांटा येथून हॅक करण्यात आले होते. देशातील 60-70 रुग्णालयांचे व्हिडिओ हॅक झाले आहेत. आरोपी फोटो आणि व्हिडिओ विकून पैसे कमवत होते.
पायल रुग्णालयाचा सीसीटीव्ही हॅक
रुग्णालयाशिवाय महिलांचे थिएटर आणि मॉलमधील व्हिडीओ आरोपींकडे सापडले आहेत. पायल रुग्णालयाचा सीसीटीव्ही हा फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये हॅक करण्यात आला होता. महिला रुग्णांची तपासणी करतानाचे आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल करण्यात आले. व्हिडीओ खरेदी विक्री करणारे टेलिग्राम चॅनेल हे महाराष्ट्रातून चालवण्यात येत असल्याची माहिती समोर आली.