गुरुवारी (14 मार्च) ममता बॅनर्जींसोबत यांच्यासोबत मोठी घटना घडली. त्या पडल्या आणि गंभीर जखमी झाल्या. त्यांच्या कपाळाला मोठी दुखापत झाली. गंभीर अवस्थेत त्यांना कोलकाता येथील सरकारी एसएसकेएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
ममता बॅनर्जींसोबत काय घडलं?
माहितीनुसार सुब्रत मुखर्जी यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी ममता बॅनर्जी गुरुवारी दुपारी एकादलियामध्ये गेल्या होत्या. तिथून त्या कालीघाट येथील आपल्या घरी परतल्या. त्यावेळी अभिषेक बॅनर्जी घरात उपस्थित होते. अपघात झाल्यानंतर त्यांना अभिषेक यांच्या कारमधून एसएसकेएममध्ये नेण्यात आलं.
advertisement
हॉस्पिटलच्या अधिकाऱ्याचा धक्कादायक खुलासा
तृणमूल काँग्रेसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री संध्याकाळी घरी ट्रेडमिलवर चालत असताना कोसळल्या. पण आता एसएसकेएम रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी धक्कादायक माहिती दिली. बॅनर्जी यांच्या कालीघाट येथील घरात मागून ढकलून दिल्याने त्या कोसळल्या, असं या अधिकाऱ्यानं सांगितलं.
आजी-आजोबांनो तयार राहा! दहावी-बारावीला असलेल्या नातवंडानंतर आता तुमची परीक्षा
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या कालीघाट येथील घरात मागून ढकलून दिल्याने त्या कोसळल्या. एसएसकेएम रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. मुख्यमंत्री गुरुवारी रुग्णालयातून घरी परतल्यानंतर एसएसकेएमचे संचालक मनिमॉय बॅनर्जी म्हणाल्या, "मागून ढकलल्यामुळे ममता बॅनर्जी पडल्या. मुख्यमंत्र्यांना सायंकाळी साडेसातच्या सुमारास रुग्णालयात आणण्यात आले. त्यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे. कपाळावर खोल जखम आहे. जखमेतूनही खूप रक्त निघालं आहे. मुख्यमंत्र्यांच्या कपाळावर तीन आणि नाकाला एक टाका पडला आहे."
"रुग्णालयातील न्यूरोसर्जरी, मेडिसीन आणि कार्डिओलॉजी विभागाच्या प्रमुखांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यांच्या जखमेवर मलमपट्टी लावली. ईसीजी, सीटी स्कॅनसह अनेक चाचण्या करण्यात आल्या. त्यांना रात्रभर रुग्णालयात राहण्याचा सल्ला देण्यात आला. पण त्यांना घरी परत जायचं होतं. त्यामुळे त्यांना घरी जाण्याची परवानगी देण्यात आली", असं मनिमॉय यांनी सांगितल्याचं वृत्त टीव्ही 9 दिलं आहे.
One Nation One Election: भविष्यात सर्व निवडणुका एकाचवेळी होतील का?
दुसरीकडे त्यांना कोणीही मागून ढकललं नाही, उलट डोकं फिरवल्यामुळे त्यांना कोणीतरी मागून ढकलल्यासारखं वाटू शकतं, त्या अडखळल्या आणि पडल्या, असं इतर तज्ज्ञ डॉक्टरांचं म्हणणं आहे.
पोलिसांकडून तपास सुरू
दरम्यान याप्रकरणी आता पोलिसांनी तपास सुरू केला आहे. कोलकाता पोलीस मुख्यमंत्र्यांच्या अपघाताचा प्राथमिक तपास करत आहेत. कोलकाता पोलीस आयुक्तांना मागून ढकलण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. कोलकाता पोलिसांचं विशेष पथक या संपूर्ण घटनेचा तपास करत आहे. गरज पडल्यास सायंटिफिक विंग आणि फॉरेन्सिक तज्ज्ञांची मदत घेतली जाईल, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे.