Maoist Organization: माओवादी संघटनेसाठी आज एक मोठा धक्का देणारी बातमी समोर आली आहे. माओवादी संघटनेत गेली 45 वर्षे सक्रिय आणि आर्थिकदृष्ट्या महत्त्वाच्या भूमिकेत असलेल्या टॉप लीडर बंडी प्रकाश याने आज हैदराबाद पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे.बंडी प्रकाश हा माओवाद्यांच्या संघटनेत आर्थिक दृष्ट्या महत्त्वाच्या भूमिकेत आहे.
गेली 45 वर्ष माओवादी संघटनेत सक्रिय असलेला बंडी प्रकाश माओवाद्यांच्या संघटनेसाठी तेंदुपत्ता, कोळसा खाणींचे व्यापारी अशा अनेक उद्योगांकडून आंध्र प्रदेश तेलंगाना छत्तीसगड आणि महाराष्ट्रामधून संघटनेसाठी आर्थिक मदत गोळा करण्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिकेत होता. कोळसा खाणींशी संबंधित कर्मचाऱ्यांच्या माओवादी संघटनेचा तो प्रमुख तसेच माओवाद्यांच्या माध्यम विभागाचा दंडकारण्य प्रभारी म्हणूनही तो काम पाहत होता.अनेक हिंसक घडामोडी त्याचा प्रत्यक्ष सहभाग होता.
advertisement
बंडी प्रकाशवर दीड कोटीचे बक्षीस
महाराष्ट्र तेलंगणा सीमावरती भाग छत्तीसगड तेलंगणा सीमेवर ही तो सक्रिय भूमिकेत होता. काही महत्त्वपूर्ण चकमकी या सीमावरती भागात घडल्या होत्या, त्यातून बंडी प्रकाश अनेकदा सुरक्षित सुरक्षा दलांच्या हातून निसटला. सगळ्या राज्यांचा मिळून बंडी प्रकाशवर दीड कोटीचे बक्षीस असून बंडी प्रकाश सारखा महत्त्वपूर्ण नेता आत्मसमर्पण करत असल्याने माओवादी संघटनेला मोठा हादरा बसला आहे.
माओवादी चळवळीला मोठा धक्का
माओवाद्यांच्या संघटनेत सर्वोच्च असलेला 40 दशकं माओवादी संघटनेला उंचीवर नेणारा त्यांचा बौद्धिक चेहरा अशी ओळख असलेला मल्लोजुला वेणुगोपाल उर्फ भूपती उर्फ सोनू याने काही दिवसांपूर्वी सुरक्षा यंत्रणांसमोर शस्त्र टाकले आहेत. भूपती हा संघटनेतील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा नेता ओळखला जातो. भूपतीसोबत 60 माओवाद्यांनी देखील आत्मसमर्पण केल. त्यानंतर आता आर्थिकदृष्ट्या महत्त्वाच्या भूमिकेत असलेल्या टॉप लीडर बंडी प्रकाश याने आत्मसमर्पण केल्याने माओवादी चळवळीला मोठा धक्का बसला असल्याचे म्हटले जात आहे.
